नवी दिल्ली, 28 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रकृती खालावली आहे. उच्च रक्तदाब समस्येमुळे अण्णांना डाॅक्टरांनी सक्तीची विश्रांतीचा सल्ला दिलाय.
लोकपाल विधेयक आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अण्णा हजारे गेल्या सहा दिवसांपासून रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहे. सरकारकडून अजूनही अण्णांच्या मागण्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. आज सहाव्या दिवशी अण्णांची प्रकृती खालावली आहे. उच्च रक्तदाब समस्येमुळे अण्णांना डाॅक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला. अण्णांसोबत आणखी 16 आंदोलकांची प्रकृती देखिल खालावली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, अण्णांच्या मागण्याचा पंतप्रधान कार्यालयाकडून मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र या मसुद्यात काही त्रुटी आढळल्यामुळे अण्णांनी तो नाकारलाय. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांसोबत वारंवार चर्चा करत आहे. मात्र, त्यांना तोडगा काढण्यात अपयश आलंय.
तर आज काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अण्णांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.