मोदी सरकारने लोकपाल विधेयक आणखी शिथिल केलं, अण्णा पुन्हा 'जंतरमंतर'वर

मोदी सरकारने लोकपाल विधेयक आणखी शिथिल केलं, अण्णा पुन्हा 'जंतरमंतर'वर

तसंच आता या आंदोलनापासून केजरिवाल यांना ४ हात दूर ठेवणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

02 आॅक्टोबर : लोकपाल विधेयक ६ वेळा पटलावर आणलं पण पुढे काहीही झालं नाही, अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा लोकपालसाठी आंदोलनाची घोषणा केलीये. तसंच लोकपाल विधेयक मोदी सरकारनं आणखी शिथिल केलं, असा आरोपही त्यांनी केला.

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. अण्णांनी आता थेट मोदी सरकारवर विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अण्णा हजारेंनी पत्रकार परिषद घेऊन लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय.

पंतप्रधान माझ्या सारख्या सामान्य लोकांच्या पत्राला उत्तर देत नाही. मोदी म्हणाले होते, परदेशातला काळा पैसा परत आणणार, पण नोटबंदी करून सुद्धा देशातला कचरा ते परत आणू शकलेले नाहीत, अशी टीका अण्णांनी केली.

तसंच आता या आंदोलनापासून केजरिवाल यांना ४ हात दूर ठेवणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं.

First published: October 2, 2017, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading