LIVE NOW

LIVE : अण्णा करत असलेल्या मागण्या आधीच पूर्ण झाल्या-गिरीश महाजन

अण्णांच्या आंदोलनात देशभरातील हजारो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले आहे. लोकपालसह राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहे.

Lokmat.news18.com | March 23, 2018, 1:33 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 23, 2018
auto-refresh

Highlights

Load More
23 मार्च :  जनलोकपाल आंदोलनासाठी पुन्हा एकदा ज्येष्ठ अण्णा हजारे मैदानात उतरले आहे.  दिल्लीत रामलीला मैदानात अण्णांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार अण्णांनी केलाय. आज सकाळी अण्णा महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनात कार्यकर्ते येत आहे पण त्यांना रोखण्यासाठी सरकारने रेल्वे गाड्या रद्द केल्या असा आरोप अण्णांनी केली. महाराष्ट्र सदनातून निघाल्यानंतर अण्णा शहीद पार्क स्मारकच्या ठिकाणी पोहोचले. शहिदांना आदरांजली व्यक्त केल्यानंतर राजघाटावर पोहोचले. राजघाटावर अण्णांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली, यावेळी अण्णांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर दुपारी 11.30 च्या सुमारास अण्णा रामलीला मैदानात पोहोचले. अण्णांच्या आंदोलनात देशभरातील हजारो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले आहे. लोकपालसह राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट या अण्णांच्या  प्रमुख मागण्या आहे. दरम्यान, सकाळी आंदोलनाच्या काही तासांपूर्वीच गजेंद्र शेखावत आणि गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली होती. आंदोलनापूर्वी अण्णा हजारेंची मनधरणी करण्याचा हा प्रयत्न यावेळी करण्यात आला होता. अण्णा हजारे यांच्या 10 मागण्या 1. कृषिमुल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्यावा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्के जास्त दर द्या 2. केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार पेन्शन 3. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा 4. शेतकऱ्यांच्या पिकाचा समूह विमा न काढता वैयक्तिक विमा काढावा, नुकसानीचे पंचनामेही वैयक्तिक असावेत 5. शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या कर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारू नये 6. शेतमजुरांना उत्पादन सुरक्षा आणि रोजगाराची हमी द्या 7. शेतीच्या औजारांवरील जीएसटी माफ करा 8. लोकायुक्त आणि लोकपालाची तातडीनं नियुक्ती करावी 9. राईट टू रिजेक्ट 10. राईट टू रिकॉल
corona virus btn
corona virus btn
Loading