05 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. अण्णा 23 मार्चपासून दिल्लीत मोदी सरकारविरोधात उपोषणाला बसणार आहेत.
अण्णांनी आपल्या दिल्लीतल्या कार्यालयच उद्घाटन करून पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिलाय. दिल्लीतील पंजाबी बाग परिसरातील कार्यालयाचे उदघाटन झाल्यावर न्यूज़18 लोकमतशी बोलताना अण्णांनी सरकारवर टीका केली.
मोदी सरकार फक्त आश्वासनांचं गाजर वाटतंय. भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करून प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातलं जात असल्याचा आरोप अण्णांनी केलाय.
तसंच 60 वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन देण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांनाची फसवणूक करतंय. भ्रष्टाचाराच्या विरोधात आणलेला लोकपाल कायदा कमकुवत आहे. याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी यावेळी केली.