अखेर अण्णा हजारेंनी उपोषण सोडलं

अखेर अण्णा हजारेंनी उपोषण सोडलं

लोकपाल विधेयकासाठी गेले सहा दिवस उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीला पोचले.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मार्च :  अण्णा हजारेंनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई फळाला आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग रामलीला मैदानावर जाऊन त्यांनी अण्णांची भेट घेतली. त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. अण्णा हजारेंच्या मागण्यांसंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केलाय.

दरम्यान गिरीश महाजन यांनी अनेकदा अण्णांची भेट घेऊन त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही  असा पवित्राच अण्णांनी घेतलाय.

उपोषणामुळे अण्णांचं वजन तब्बल साडे 5 किलोने घटले असून त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. तसेच, अण्णांनी आज उपोषण सोडण्याची गरज आहे. तसं न केल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याचबरोबर, आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत.

अण्णा हजारे यांच्या 10 मागण्या

1. कृषिमूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्यावा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्के जास्त दर द्या

2. केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार पेन्शन

3. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

4. शेतकऱ्यांच्या पिकाचा समूह विमा न काढता वैयक्तिक विमा काढावा, नुकसानीचे पंचनामेही वैयक्तिक असावेत

5. शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या कर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारू नये

6. शेतमजुरांना उत्पादन सुरक्षा आणि रोजगाराची हमी द्या

7. शेतीच्या अवजारांवरील जीएसटी माफ करा

8. लोकायुक्त आणि लोकपालाची तातडीने नियुक्ती करावी

9. राईट टू रिजेक्ट

10. राईट टू रिकॉल​

आता या आंदोलनावर सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार  आहे.

First published: March 29, 2018, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading