अण्णा द्रमुकचा केंद्रीय मंत्रिमंडळात होणार समावेश

अण्णा द्रमुकचा केंद्रीय मंत्रिमंडळात होणार समावेश

18 ऑगस्टला होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये अण्णा द्रमुकलाही मंत्रिपदं मिळणार आहे.

  • Share this:

1 ऑगस्ट: नितीश कुमारांच्या पाठोपाठ आता तामिळनाडूचा अण्णा द्रमुक हा पक्षही एन.डी.एत सहभागी होणार आहे. 18 ऑगस्टला होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अण्णा द्रमुकलाही मंत्रिपदं मिळणार आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय स्थैर्य आणण्यासाठी अण्णा द्रमुकला भाजपचा पाठिंबा गरजेचा आहे. अण्णा द्रमुकच्या एक ते दोन नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदं मिळणार आहेत. त्याबदल्यात तामिळनाडू सरकारमध्ये काही मंत्रिपदांवर भाजपची वर्णी लागू शकते.

18 ऑगस्टला संसदेचं अधिवेशन संपल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. तामिळनाडूत निवडणुकीतून भाजपला सरकारमध्ये शिरता आलं नाही, तर आता मागच्या दारातून भाजप शिरू पाहतोय. याचा फायदा पक्षाला २०१९च्या लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

First published: August 1, 2017, 9:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading