पशू संवर्धन मंडळास हवी गोमातेसाठी अभयारण्यं

पशू संवर्धन मंडळास हवी  गोमातेसाठी अभयारण्यं

खरं तर हे मंडळ प्राण्यांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावे म्हणून 1962 साली उभारलंय.पण आज मात्र भाजप सरकारात आल्यानंतर 3 वर्षांनी या मंडळातले 7 ही सल्लागार आता गाय विषयातले तज्ज्ञ आहेत .

  • Share this:

15 जून : भारत सरकारचे काही दिवसांपासून गो हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावलाय .आधी गायींसाठी आधार कार्ड ,गोहत्येसाठी गुरांच्या  विक्रीवर बंदी आणि आता गोमातेसाठी  अभयारण्य उभारावं असं भारत  सरकारच्या  पशू संवर्धन मंडळाच्या सल्लागारांचं म्हणणं आहे.

खरं तर हे मंडळ  प्राण्यांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावे म्हणून 1962 साली उभारलंय.पण आज मात्र भाजप सरकारात आल्यानंतर 3 वर्षांनी  या मंडळातले 7 ही सल्लागार  आता गाय विषयातले तज्ज्ञ  आहेत . यांना पशू संवर्धन मंडळाचा वापर गो संवर्धनासाठी करायचाय.गायींना गोठ्यात आणि गोशाळेत बांधून ठेवणं योग्य नाही ,त्यांना चरायला आणि मलमूत्र विसर्जन करायला स्वतंत्र जागा हव्या .त्यामुळे त्यांना मुक्तपणे फिरता येईल अशी मोकळी, लांबच  लांब पसरलेली  गो अभयारण्ये उभारावी  असं यांचं मत आहे.

तसंच गोमुत्राच्या  औषधी गुणांवरही संशोधन करावं असं या तज्ज्ञांचं मत आहे. गायींची परिस्थिती सुधारण्यासाठी गो जनगणना घेणं गरजेचेचं  नव्हे तर  अत्यावश्यक आहे असं यांचं म्हणणं  आहे.

दरम्यान,  'गायीसोबत इतर प्राण्यांनाही जीव असतो,त्यांचाही विचार करा' असा  सल्ला या तज्ज्ञांना पशू कार्यकर्त्या  रुक्मिणी शेखर यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 03:18 PM IST

ताज्या बातम्या