Home /News /national /

चीड आणणारी घटना! महिलेने कुत्र्याच्या पिल्लाला सँडल्सच्या हिल्सने चिरडून मारल्याचा Video व्हायरल, FIR दाखल

चीड आणणारी घटना! महिलेने कुत्र्याच्या पिल्लाला सँडल्सच्या हिल्सने चिरडून मारल्याचा Video व्हायरल, FIR दाखल

एका लहानशा पिल्लाला चिरडून कोण कसं मारु शकेल, समोरच्या जीवाचा आपण अजिबातचं विचार करीत नाही का?

    लखनऊ, 27 ऑगस्ट : लखनऊमध्ये (Lucknow) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. या व्हिडीओमध्ये कारमध्ये बसलेली एक महिला कुत्र्याच्या पिल्लाला (Puppy) पायाने चिरडून मारण्याचा प्रयत्न करीत आहे. या लहानशा पिल्लांसोबत इतकं क्रुर कोणी कसं असू शकतं? ही महिला लखनऊमधील ओमेक्स सिटीमध्ये राहणारी असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी अत्यंच चीड व्यक्त केली आहे. त्यानंतर या महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन व्हिडीओ झाले व्हायरल या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की महिला कारमध्ये बसलेली आहे आणि ती आपल्या पायाने कुत्र्याच्या पिल्लाला चिरडत आहे. पहिल्यांदा ती पायाने हळूहळू त्याच्यावर जोर देते, त्यानंतर पूर्ण ताकद लावून आपल्या चपलेच्या हिल्सने त्याला चिरडते. ज्यामुळे ते पिल्लू ओरडू लागतं. याप्रमाणे आणखी एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये दुसऱ्या पिल्लाही त्याचप्रमाणे पायाने चिरडून मारण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पिल्लांचा मृत्यू होता. प्राणीप्रेमींचा आक्रोश सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवी दिल्ली प्राणीप्रेमींमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. प्राणीप्रेमींचा आक्रोश पाहता पोलिसांनी गोमतीनगरच्या विभूतीखंड ठाण्यात महिलांच्या विरोधात प्राणी क्रुरता अधिनियमअंतर्गत आयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्पेक्टर विभूतिखंड संजय शुक्ला यांनी सांगितले की, कामना पांडेच्या तपासानंतर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच या महिलेला ताब्यात घेण्यात येईल. त्यांनी सांगितले की पूजा ढिल्लन नावाच्या महिलेविरोधात आयपीसी कलम 429 आणि अॅनिमल क्रुएलिटी अॅक्टमध्ये एफआयआऱ दाखल करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या