परप्रांतीयांवरून केजरीवाल विरुद्ध राज्यपाल; देशभर गाजणारा दिल्लीतला वाद नेमका काय?

परप्रांतीयांवरून केजरीवाल विरुद्ध राज्यपाल; देशभर गाजणारा दिल्लीतला वाद नेमका काय?

'मी मुळचा दिल्लीचा नाही. पण दिल्लीत राहून काम करतो. मग मी दिल्लीकर आहे की नाही?' सोशल मीडियावर केजरीवालांच्या निर्णयानंतर वाद सुरू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जून : परप्रांतीय विरुद्ध भूमिपुत्र हा वाद आपल्याला विशेषतः महाराष्ट्राला नवा नाही. परप्रांतीयांचे लोंढें मुंबईबाहेर पडू लागले तेव्हाही या वादाची नव्याने जाणीव झाली होती. पण दिल्लीत परप्रांतीय रुग्णांच्या उपचारावरून नेमका काय वाद सुरू झाला आहे? यावरूनच मुख्यमंत्री केजरीवाल विरुद्ध नायब राज्यपाल असा वाद आता देश गाजवतो आहे. काय आहे हे सगळं प्रकरण?

'मी मुळचा दिल्लीचा नाही. पण दिल्लीत राहून काम करतो. मग मी दिल्लीकर आहे की नाही?' केजरीवालांकडे उत्तर मागणारं हे Tweet केलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी. कोण खरे दिल्लीकर यावरून आता सोशल मीडियावरसुद्धा चर्चेला उधाण आलं आहे.

हा प्रश्न निर्माण झाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या एका निर्णयावरून.

दिल्लीत गेल्या दोन-तीन दिवसात Coronavirus ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रुग्णांना सामावून घ्यायला पुरेशी रुग्णालयं आहेत  का असा प्रश्न निर्माण झाल्यावर केजरीवालांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दिल्लीकरांना प्राधान्याने उपचार मिळतील. परप्रांतीयांनी दिल्लीत उपचारासाठी येऊ नये असा आदेश काढला.

या आदेशावरून दिवसभर चर्चा सुरू होती. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरावाल यांना हा आदेश मागे घ्यायला लावला.

संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन

त्यावर नाराजी व्यक्त करत केजरीवाल यांनी देशभरातून येणाऱ्या रुग्णांना दिल्लीत कसे उपचार द्यायचे असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

दिल्लीच्या नायब राज्यपालांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सगळे निर्णय फिरवल्यामुळे राजधानीत मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असा वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यात भाजपचं राजकारण असल्याचे आरोप केले आहेत..

केजरीवालांची उद्या COVID टेस्ट

दरम्यान अरविंद केजरीवाल यांना कालपासून तापाची लक्षणं जाणवू लागली आहेत. त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची उद्या Coronavirus ची चाचणी होणार आहे.

(संकलन, संपादन - अरुंधती )

अन्य बातम्या

CM ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर काय घडलं? सोनू सूदने दिली प्रतिक्रिया!

आईच्या उपचारासाठीही नाहीत पैसे; अभिनेत्रीने चाहत्यांसमोर पसरले हात

First published: June 8, 2020, 10:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading