मोदींच्या मुलाखतीनंतर चर्चेत आलेल्या ANI ने डिलिट केलं अमित शहांबद्दलचं 'हे 'ट्वीट

महाराष्ट्रातील भाजप खासदारांसोबत झालेल्या बैठकीत अमित शहा यांनी स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत, असं ट्वीट 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 07:54 PM IST

मोदींच्या मुलाखतीनंतर चर्चेत आलेल्या ANI ने डिलिट केलं अमित शहांबद्दलचं 'हे 'ट्वीट

नवी दिल्ली, 3 जानेवारी : महाराष्ट्रातील भाजप खासदारांसोबत झालेल्या बैठकीत अमित शहा यांनी स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत, असं ट्वीट 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं केलं होतं. पण भाजपने हा दावा खोडून काढल्यानंतर 'एएनआय'ला हे ट्वीट डिलीट करावं लागलं आहे.

'आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावरही लढावी लागू शकतो. त्यामुळे तशी तयारी करा, अशी चर्चा अमित शहा यांच्या नेतृ्त्वामध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत झाली,' अशी माहिती ट्वीटद्वारे 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं दिली होती. पण भाजपने हे वृत्त फेटाळलं आहे. त्यानंतर आता 'एएनआय'नेही आपलं ट्वीट डिलीट केलं आहे.


बैठकीनंतर काय म्हणाले होते दानवे?

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक झाली. या बैठकीत भाजप-शिवसेना युतीवर चर्चा झाली का, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दानवे म्हणाले की, "युतीची चर्चा या बैठकीत होत नसते. एनडीएला सोबत घेऊन निवडणुका व्हाव्यात, असं आम्हाला वाटतं. मतांचं विभाजन टाळावं, विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये, अशी आमची भूमिका आहे."

Loading...

महिनाभरात युतीचा निर्णय घ्या, भाजपचा शिवसेनेला अल्टीमेटम

लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त पाच महिने राहिले आहेत. तर आचारसंहिता दोन महिन्यात लागू होईल. त्यामुळं युतीबाबत महिन्याभरात निर्णय घ्या असा अल्टिमेटम भाजपने शिवसेनेला दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीसाठी भाजपने शिवसेनेला वारंवार आवाहन केलं मात्र सेनेकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे जास्त वाट पाहायची नाही असं भाजपने ठरवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

युतीबाबत शिवसेनेशी बोलणी करण्यास भाजप सकारात्मक आहे. विधानसभेत काही जास्त जागा देण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. जानेवारी महिन्यापर्यंतच वाट बघू नंतर स्वबळाची तयारी करू असं भाजपन ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि सेनेत कटुता निर्माण झाली होती.

सत्तेत सहभागी होऊनही सेनेचं वागणं हे कायम विरोधी पक्षासारखच आहे. भाजप, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीनंतरच त्यांनी स्वबळावर निवडणुक लढण्याची घोषणा केली होती.


VIDEO : संभाजी महाराज कोणाला देणार शिक्षा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...