चिकनऐवजी पतीनं आणली प्लेन बिर्याणी, संतापलेल्या पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल

चिकनऐवजी पतीनं आणली प्लेन बिर्याणी, संतापलेल्या पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल

घरापासून जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये एकावर एक फ्री अशी चिकन बिर्याणीची ऑफर सुरू होती.

  • Share this:

चेन्नई, 28 जून: पतीनं चिकनऐवजी प्लेन बिर्याणी आणल्यानं संतापलेल्या पत्नीनं स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौम्या (28) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तमिळनाडुतील मामल्लपुरम येथे ही घटना घडली आहे.

हेही वाचा..ऐकावं ते नवलच...! गावठी दारूचा हातपंप पाहून पोलिस अधिकारी देखील चक्रावले

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनोहरन (32) आणि सौम्या (28) मूर्ती बनवण्याचं काम करत होते. घरापासून जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये एकावर एक फ्री अशी चिकन बिर्याणीची ऑफर सुरू होती. मात्र, मनोहरन यानं चिकनऐवजी प्लेन बिर्याणी आणल्यामुळे सौम्या प्रचंड संतापली. तिनं संतापाच्या भरात अंगावर पेट्रोल टाकून स्वत: ला पेटवून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दोघांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक 10 वर्षांचा मुलगा आणि एक 11 वर्षांची मुलगी आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सौम्या आणि मनोहरनच्या घराजवळ एक नवे रेस्टॉरंट सुरू झाले होते. तिथे एकावर एक फ्री चिकेन बिर्याणीची ऑफर सुरू होती. ही ऑफर पाहून सौम्या हिनं पतीकडे चिकन बिर्याणी आणण्याचा आग्रह धरला. मात्र, मनोहरन हा रेस्टॉरंट गेला तोपर्यंत चिकन बिर्याणी संपली होती. त्यामुळे त्यानं प्लेन बिर्याणी आणली. ते पाहून सौम्या नाराज झाली. तिनं प्लेन बिर्याणी खाण्यास नकार दिला. कारण तिला चिकन बिर्याणीच खायची होती. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. नंतर मनोहरन यानं बिर्याणी शेजाऱ्याला दिली.

हेही वाचा..चहातल्या साखरेमुळं संपवला आयुष्याचा गोडवा, पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

पतीवर नाराज झालेल्या सौम्या हिनं स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं. नंतर अंगावर पेट्रोल ओतून स्वत: ला पेटवून घेतलं. गंभीर अवस्थेत सौम्याला एका शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

First published: June 28, 2020, 1:01 PM IST

ताज्या बातम्या