Home /News /national /

Russia-Ukraine War मध्ये अभिनेत्री सोनम कपूरची एन्ट्री, हे लवकर संपायला हवे...

Russia-Ukraine War मध्ये अभिनेत्री सोनम कपूरची एन्ट्री, हे लवकर संपायला हवे...

sonam kapoor

sonam kapoor

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात जवळपास मागील 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले सुरू असून दोन्ही देशांमधील युद्धामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी देश सोडला आहे. दरम्यान, युक्रेनच्या युद्धग्रस्त शहर सुमीमध्ये(Sumy) अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 9 मार्च: रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात जवळपास मागील 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले सुरू असून दोन्ही देशांमधील युद्धामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी देश सोडला आहे. दरम्यान, युक्रेनच्या युद्धग्रस्त शहर सुमीमध्ये(Sumy) अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये त्यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखले जात आहे. त्याला स्थानिक दुकानांमध्येही वर्णद्वेषाचा सामना करावा लागत होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर भडकली (Sonam Kapoor). तिने थेट सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पीटीआय न्यूज रिपोर्ट शेअर करताना सोनम कपूर संताप व्यक्त केला आहे. पूर्व युक्रेनमधील सुमी शहरात 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी बाहेर काढण्याची वाट पाहत आहेत. आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे शेअर करत तिने भारतीय विद्यार्थ्यांविरोधात होत असलेल्या वर्णद्वेषावर भाष्य केले आहे. या युद्धात भारतीय लोकांना दोन्ही बाजूंनी वर्णद्वेषाचा सामना करावा लागत आहे. भारतीयांना जी वागणूक दिली जात आहे ती अत्यंत निंदनीय आहे, ती त्वरित थांबवली पाहिजे. अशा शब्दात तिने आपला राग व्यक्त केला आहे. युद्धग्रस्त यु्क्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन गंगा(Operation Ganga) अंतर्गत सी - 17 ग्लोबमास्टर विमानाचा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेल्या 15,920 नागरिकांना 76 विशेष विमानांद्वारे भारतात आणण्यात आले आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक भारतीय या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत, अडकलेल्या भारतीयांना तसेत भारतीय विद्यार्थ्यांना तेथुन बाहेर काढणे, हे खुप मोठे आव्हान आहे. या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पुन्हा मदतीला धावला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Entertainment, Russia Ukraine, Russia's Putin, Sonam Kapoor

    पुढील बातम्या