अजब! दातांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या पोटात घुसली सुई, प्रकृती गंभीर

अजब! दातांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या पोटात घुसली सुई, प्रकृती गंभीर

पीडित रमनदीप कौरला बराच काळ दातदुखीचा त्रास होता. यामुळे तिने डॉ. जपनीत कौर यांच्या खासगी दंत चिकित्सालयात उपचारासाठी गेली.

  • Share this:

संगरूर (पंजाब), 11 डिसेंबर : पंजाबच्या संगरूरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. निष्काळजीपणामुळे दातांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या एका युवतीच्या पोटात सुई घुसली आहे. यानंतर तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी तरुणीला चंदीगडच्या पीडीआय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी डॉक्टरांवर यासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

दात दुखीमुळे होती अस्वस्थ

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित रमनदीप कौरला बराच काळ दातदुखीचा त्रास होता. यामुळे तिने डॉ. जपनीत कौर यांच्या खासगी दंत चिकित्सालयात उपचारासाठी गेली. 8 डिसेंबरला तिला फिलिंग करण्यासाठी बोलावण्यात आलं. रमनदीपच्या वडिलांनी सांगितले की, रूट कॅनलसाठी जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा निष्काळजीपणामुळे रमनदीपच्या पोटात सुई गेली.

इतर बातम्या - नाराज आहात का? असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...

प्रकृती गंभीर झाल्यानंतर पीजीआय रुग्णालयात केलं दाखल

पीडितेचे वडील सोहन सिंग यांनी सांगितले की,मुलीची प्रकृती चिंताजनक झाली आहे. तिला ऑपरेशनसाठी चंदीगड येथे पाठविण्यात आलं. तिथून तिला प्रथम पटियाला आणि त्यानंतर पीजीआय येथे भर्ती केले गेले. त्याचबरोबर पीजीआयचे डॉक्टर मुलीवर उपचार करत आहेत.

इतर बातम्या - लेकीची पाठवणी करण्याआधी बापाचाच संसार उद्ध्वस्त, आयुष्याची जमापुंजी जळून खाक!

उपचार नाही

जपनीत कौरवर आरोप करीत पीडितेच्या वडिलांनी सांगितले की त्याने रमनदीपशी चांगले वर्तन केले नाही. इंजेक्शन दिल्यानंतर त्याने मुलीला क्लिनिकमधून बाहेर काढले. पण जपनीत कौर यांनी आपली चूक मान्य करण्यास नकार दिला असा आरोपही त्याने केला आहे. सध्या ही बाब पोलीस व सीएमओपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन डॉक्टरांचे पॅनेल तयार केले आहे.

इतर बातम्या - क्रूरतेचा कळस! बुलडाण्यात 16 वर्षीय गतिमंद मुलीवर दोघांनी केला बलात्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 12:58 PM IST

ताज्या बातम्या