फेसबुकसमोर पोलिसही हरले! 12 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलीला मिळाले आई-बाबा

फेसबुकसमोर पोलिसही हरले! 12 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलीला मिळाले आई-बाबा

फेसबुकची कमाल! अंगावर काटा आणणारी ही बातमी एकदा वाचाच.

  • Share this:

विजयवाडा, 09 डिसेंबर : फेसबुक शाप की वरदान याबाबत आजही वाद आहेत. एकीकडे फेसबुकवरून खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे आरोप होत असताना, याच सोशल मीडियामुळं एका मुलीला आपले आई-बाबा सापडले. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील एक मुलगी 12 वर्षानंतर आपल्या कुटूंबाला भेटणार आहे. ही मुलगी वयाच्या चौथ्या वर्षी हरवली होती आणि ती फेसबुकद्वारे आपल्या कुटुंबाला भेटणार आहे.

विजयवाडा येथे राहणारे वंशी कृष्णा हे हरवेल्या मुलांच्या कुटुंबियांना शोधण्याचे काम करतात. हे काम फेसबुकच्या माध्यमातून केले जाते. वयाच्या चौथ्या वर्षी हरवलेली भवानी वंशी कृष्णाच्या घरी काम करण्यासाठी आली होती. भवानी वयाच्या चौथ्या वर्षी विजयवाड्यात आईवडिलांपासून विभक्त झाली होती. यानंतर तिला एका बाईने दत्तक घेतले आणि तेव्हापासून ती त्या बाईबरोबर विजयवाड्यात राहत होती. याबाबत भवानीनं, “कुटुंबीयांना परत भेटून मला खूप आनंद झाला आहे”, असे सांगितले. वंशी कृष्णा यांना फेसबुकवर भवानीचा भाऊ सापडला, त्यामार्फत त्यांनी भवानीच्या कुटुंबियांना शोधले.

वाचा-'पोर्नोग्राफी, सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडिओचा भारतात मोठा व्यापार'

एएनआय या वृत्तसंस्थेतीशी बोलताना वंशी कृष्णा यांनी, "कोणालाही काम देण्यापूर्वी मी त्यांची कागदपत्रे पाहातो. म्हणूनच भवानीचे वय काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी या मुलीकडून कागदपत्रे मागितली. यावर भवानीनं वयाच्या चौथ्या वर्षी हरवली असल्याचे सांगितले”, अशी माहिती दिली. भवानीला खऱ्या आई-वडिलांना भेटायचे असल्यामुळं कृष्णा यांनी मदत करण्याचे आश्वासन दिला. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून भवानीच्या पालकांचा शोध सुरू केला.

वाचा-SBI ची कर्जे होणार स्वस्त, बँकेने घेतला मोठा निर्णय!

वंशी यांनी, "मी माझ्या काही ओळखीच्या मित्र-मैत्रिणींना या मुलीबद्दल सांगितले आणि त्यातील एकाने मला दिलेल्या माहितीवर मेसेज केला. यानंतर मी सर्व माहिती गोळा करून तिच्या भावाला व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर खात्री पटल्यानंतर आता भवानीला आम्ही त्यांच्याकडे सोपवणार आहोत", असे सांगितले. दरम्यान वयाच्या चौथ्या वर्षी हरवलेली भवानी अखेर 12 वर्षांनी आपल्या कुटुंबियांना भेटणार आहे.

वाचा-स्मशानभूमीतच घेतला गळफास, चिठ्ठीत लिहलं धक्कादायक कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या