बापानं आपल्याच मुलाच्या डोक्याचे हातोड्यानं केले दोन तुकडे, CCTV मध्ये कैद झाला हत्येचा थरार

बापानं आपल्याच मुलाच्या डोक्याचे हातोड्यानं केले दोन तुकडे, CCTV मध्ये कैद झाला हत्येचा थरार

संपत्तीच्या वादातून एका वडीलांनी आपल्याच मुलाची निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 14 ऑगस्ट : आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मधील विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam) हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे संपत्तीच्या वादातून एका वडीलांनी आपल्याच मुलाची निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. गुन्हा केल्यावर आरोपीनं स्वत: पोलीस स्टेशनला पोहचला आणि आत्मसमर्पण केले. दरम्यान आंध्र प्रदेश पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव वीरा राजू असे आहे. CCTV व्हिडीओत हे स्पष्ट दिसत आहे की मृतक जलाराजू घराच्या व्हरांड्यात बसला होता. त्याचवेळी वीरा राजूने मागून येऊन त्याच्या डोक्यावर हातोडानं हल्ला केला. निर्दयी वडिलांनी मुलाच्या डोक्यावर अनेक वार केले. डोक्याला दुखापत झाल्याने जलाराजूचा मृत्यू झाला.

वाचा-मालकानेच गळा आवळून केला सालगड्याचा खून, धक्कादायक कारण आलं समोर

वाचा-अनैतिक संबंधातून रचला धक्कादायक हत्येचा कट, डोक्यात दगड घालून केलं खल्लास

पोलिसांनी सांगितले की, वडील आणि मुलगा यांच्यात संपत्तीवरून वाद होता. वादानंतर वीरा राजूने त्याचा मुलगा जलाराजूवर हातोडीने वार केला. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहचला आणि त्याने आत्मसमर्पण केले. आरोपीविरूद्ध खुनाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अधिक तपास पोलीस करत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: August 14, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या