आंध्रप्रदेशात सत्तांतर होताचं सूडाच्या राजकारणाला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी बांधलेल्या निवासस्थानावर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी थेट बुलडोझर फिरवला आहे. चंद्राबाबू सुट्टीसाठी बाहेर गेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात राज्यात राजकीय संघर्ष अटळ असल्याची चिन्हं दिसत आहेत.