मास्क लावायला सांगितलं म्हणून महिलेचे केस धरून ओढलं; लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा VIDEO VIRAL

मास्क लावायला सांगितलं म्हणून महिलेचे केस धरून ओढलं; लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा VIDEO VIRAL

  • Share this:

नेल्लोर, 30 जून : पर्यटन विभागातील हॉटेल कर्मचाऱ्यानं त्याच्या ऑफिसमधील सहकारी महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हा माणूस ऑफिसच्या आत एका महिलेला वाईट मारहाण करताना दिसत आहे. त्याचवेळी काही इतर काही सहकाऱ्यांनी बघ्याही भूमिका घेतली तर काही सहकाऱ्यांनी मध्ये पडून महिलेला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला.

या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला हे मात्र समजू शकलं नाही. मात्र हा व्हिडीओ 27 जूनचा असल्याची माहिती मिळाली आहे. दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात या तरुणानं महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हे वाचा-लग्नमंडपात डान्स करणाऱ्या महिलेच्या छातीवर तरुणानं मारली लाथ, VIDEO VIRAL

मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमधला वाद वाढला आणि त्याचं हाणामारीत रुपांतर झालं. या व्यक्तीविरूद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी दुसरी महिला खूप घाबरली आणि तिने काढता पाय घेतला. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मास्क घालण्याची विनंती केल्यानंतर या तरुणाला राग आला आणि त्यानं दिव्यांह महिलेला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading