व्यवसाय आणि उद्योगधंद्यामध्ये आंध्र प्रदेश नंबर वन आणि महाराष्ट्र थेट !

व्यवसाय आणि उद्योगधंद्यामध्ये आंध्र प्रदेश नंबर वन आणि महाराष्ट्र थेट !

व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईकडे येताना किंवा बाहेरगावी जाताना दिसतात. पण मंडळी...

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईकडे येताना किंवा बाहेरगावी जाताना दिसतात. पण मंडळी व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्यासाठी आंध्र प्रदेश हे देशातील सर्वांत अनुकूल राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी आंध्रने ही बाजी मारली आहे. यात पहिल्या 10मध्ये देखील महाराष्ट्राचा नंबर आलेला नाही.

केंद्र सरकारचा औद्योगिक धोरण विभाग आणि जागतिक बँकेतर्फे भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठीची व्यवसायसुलभ ('ईझ ऑफ डुइंग बिझनेस') मानांकन सूची मंगळवारी जाहीर करण्यात आली. या सूचीमध्ये आंध्र प्रदेशने या वर्षीही अग्रमानांकन पटकावले आहे.

जपानमधल्या पुरामध्ये मृतांची संख्या 179वर, भूस्खलनाने हाहाकार

आंध्रच्या पाठोपाठ तेलंगण आणि हरियाणा या राज्यांचा क्रमांक लागला आहे. गुंतवणुकीसाठी अनेक उपक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्राचा पहिल्या दहा राज्यांमध्येही समावेश न झाल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या यादीत महाराष्ट्र 13व्या क्रमांकावर आहे. जाहीर केलेल्या यादीनुसार खालील राज्य ही व्यवसायासाठी अनुकूल राज्ये आहेत.

व्यावसायासाठी अनुकूल राज्य

1.आंध्र प्रदेश

2. तेलंगणा

3. हरियाणा

4. झारखंड

5. गुजरात

6. छत्तीसगड

7. मध्य प्रदेश

8. कर्नाटक

9. राजस्थान

10. पश्चिम बंगाल

11. उत्तराखंड

12. उत्तर प्रदेश

13. महाराष्ट्र

14. ओडिशा

15. तामिळनाडू

हेही वाचा...

माणुसकीला काळिमा, ओळखीच्याच इसमाने साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार

FIFA WC 2018: क्रोएशियाच्या राष्ट्रपती ग्राबर कीटारोविचे बोल्ड फोटोशूट

एकेकाळी पेपर टाकणारी सनी 'या' अटीवर झाली पाॅर्नस्टार

First published: July 11, 2018, 9:36 AM IST

ताज्या बातम्या