मराठी बातम्या /बातम्या /देश /

लहान मुलांना बाधा होणाऱ्या अज्ञात आजाराचं गूढ अखेर उलगडलं

लहान मुलांना बाधा होणाऱ्या अज्ञात आजाराचं गूढ अखेर उलगडलं

आंध्रात या गूढ आजाराची 400 जणांना बाधा झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे 300 लहान मुलांना हा आजार झाला आहे.

आंध्रात या गूढ आजाराची 400 जणांना बाधा झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे 300 लहान मुलांना हा आजार झाला आहे.

आंध्रात या गूढ आजाराची 400 जणांना बाधा झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे 300 लहान मुलांना हा आजार झाला आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
एलुरू (आंध्र प्रदेश), 8 डिसेंबर: आंध्र प्रदेशात गेल्या काही दिवसात एका अज्ञात आजाराने धुमाकूळ घातला आहे. आजवर या गूढ आजाराची आंध्रातल्या एलुरू (Eluru Mystery disease ) गावात या आजाराची 400 जणांना बाधा झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे 300 लहान मुलांना हा आजार झाला आहे.  या आजाराचं कारण शोधण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने आपला अहवाल आंध्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. चक्कर येऊन बेशुद्ध पडणं, उलट्या होणं, अशक्तपणा अशी याची लक्षणं दिसल्यामुळे या 300 मुलांवर उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशातील इलुरू गावात त्यामुळे हाहाकार उडाला आहे. Coronavirus च्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा नवीनच आजार साथीसारखा पसरल्यामुळे या भागात भीती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यात किंवा दुधात मिसळत असलेल्या शिसाच्या आणि निकेलच्या अंशामुळे मुलांना विषबाधा होत असल्याचं या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा आजार कीटकनाशक किंवा डासांच्या नियंत्रणासाठी फवारण्यात येणाऱ्या औषधाच्या अॅलर्जीने होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत  होती. गेल्या काही दिवसांत राज्यात कीटकनाशकं म्हणून किंवा डासांच्या नियंत्रणाच्या नावाखाली ऑरगॅनोक्लोरिन  (Organochlorines) वापरल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला का? या दृष्टीने आंध्र प्रदेशमधील अधिकारी तपास करीत आहेत. आरोग्य मंत्रालयाने या आजाराचं गूढ उकलण्यासाठी नेमलेल्या तीन सदस्यीय तज्ज्ञ समितीमध्ये पुण्यातले विषाणूतज्ज्ञ (Virologist) डॉ. अविनाश देवशटवार यांचा समावेश आहे. या समितीने आपला अहवाल मंगळवारी संध्याकाळी सादर केला. मंत्रालयाने एलुरू आणि आजूबाजूच्या  गावांतील लोकांना झालेल्या या आजाराच्या तपासासाठी तीन सदस्यांची टीम तयार केली आहे. नवी दिल्लीतील एम्समधील (AIIMS) सहयोगी प्राध्यापक डॉ. जमशेद नायर, पुण्याच्या  एनआयव्हीतील (NIV) व्हायरॉलॉजिस्ट डॉ. अविनाश देवशटवार, आणि NCDC चे (नॅशनल सेंटर फॉर डिसीझ कंट्रोलचे ) उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या(covid 19) पार्श्वभूमीवर हा अज्ञात आजार समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्याचा प्रसार जाणून घेण्यासाठी घरगुती सर्वेक्षण केले. तब्बल 62 गावे व प्रभाग सचिवांनी 57,863 घरांमध्ये आरोग्य सर्वेक्षण केले. या आजाराचे गांभीर्य ध्यानात घेऊन 56 डॉक्टर, तीन मायक्रोबायोलॉजिस्ट, 66 परिचारिका, 117 एफएनओ आणि 99 एमएनओ ड्युटीवर लावण्यात आले आहेत. मागील 48 तासांत 62 वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली असून 20 रुग्णवाहिका 445 बेड इलुरुच्या सरकारी रुग्णालयात व इतर चार संस्थांमध्ये उपचारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भाजपचे खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली असून सरकारी वैद्यकीय तज्ज्ञांशी बोललो आणि बहुधा या आजाराचं कारण विषारी ऑरगॅनोक्लोरीन्स असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना राज्यातील सार्वजनिक आरोग्य संचालक (public health director) गीता प्रसादिनी म्हणाल्या, “ही एक शक्यता देखील असू शकते. याचं नक्की कारण शोधण्यासाठी आम्ही चाचणी अहवालाची वाट पाहत आहोत. मागील 24 तासांत एकही केस समोर आली नसून मागील आठवड्यात एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.’ बर्‍याच देशांमध्ये organochlorine वर बंदी आहे. बऱ्याच देशांमध्ये संशोधनाअंती यामुळे कॅन्सर आणि अनेक आजार होत असल्याचे समोर आल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. काही प्रदूषकं वर्षानुवर्षे वातावरणात राहतात आणि प्राणी आणि मानवी शरीरात चरबी वाढवतात. हे रसायन डास नियंत्रणासाठी वापरलेल्या डीडीटीमध्ये आढळतं. तरीही भारतात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या 157 रूग्णांवर उपचार सुरू असून 168 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व बाधित व्यक्तींपैकी 307 जण एलुरू शहरातील  30 जण इलुरुच्या ग्रामीण भागातील आणि तीन डेंडुलुरू मधील आहेत. सध्या ग्रसित व्यक्तींकडून घेतलेल्या सेरेब्रल फ्लुईड सॅम्पलच्या चाचण्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. तर दुधाचे 10 नमुने हैदराबादमधील तरनाकाजवळील Centre for Cellular and Molecular Biology (CCMB) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
First published:

Tags: Andhra pradesh, Health

पुढील बातम्या