हैदराबाद, 11 जुलै : जावई (son in law) घरी येणार म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतातच. मग लाडक्या मुलीच्या आवडीनिवडी राहिल्या बाजूला त्यापेक्षा जावयाच्या आवडीनिवडी विचारात घेतल्या जातात. जावयाला काय हवं, काय नको, त्याला कसली कमी पडायला नको, त्याला जे जे काही हवं ते मिळावं, यासाठी सासू-सासऱ्यांची धडपड सुरू असते. जावई घरी आला की त्याच्या आवडीचेच पदार्थ घरी बनतात आणि अगदी ताटभरून जावयाला जेवायला दिलं जातं.
सध्या सोशल मीडियावर अशा सासूचा (mother in law) व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जिला आपला जावई घरी येणार याचा इतका आनंद झाला आहे की तिनं एक ताट नाही तर एक टेबल भरेल इतके पदार्थ केलेत. बरं पदार्थ फक्त केलेच नाही तर ते सजवून त्याची नीट मांडणीही केली.
This lady has prepared a 67-item Andhra five-course lunch for her visiting son-in-law, consisting of a welcome drink, starters, chaat, main course and desserts! Wow! #banquetpic.twitter.com/Li9B4iNFvc
ही महिला आंध्र प्रदेशची (andhra pradesh) आहे. आंध्र प्रदेशमध्ये जमाई षष्ठी म्हणून परंपरा आहे. या परंपरेनुसार सासू आपल्या जावयाच्या स्वागतासाठी खास थाली तयार करते. या महिलेनंही आपल्या जावयासाठी अशीच थाली तयार केली आहे. या थालीत एक-दोन किंवा जास्तीत दहा पक्वान नव्हे तर तब्बल 67 पदार्थ आहेत. यामध्ये ड्रिंक्स, स्टार्टर्स, चाट, मेनकोर्स आणि मिठाई अशा 5 व्यंजनाचा समावेश आहे. या प्रत्येक पदार्थाची माहिती महिलेनं व्हिडीओत दिली आहे.
— Patrick Brauckmann (@vonbrauckmann) July 8, 2020
अनेकांनी या सासूचा जावई खूप नशीबवान असल्याचं म्हटलं आहे. एका युझरने तर चक्क या महिलेला विचारलं की तुमची दुसरी मुलगी आहे का? मला तिच्याशी लग्न करायचं आहे.
तुमच्या मनातही अशीच काहीशी भावना आली असेल. तुमचं लग्न झालं असेल तर अशी माझी सासूही अशीच असती तर असा विचार करत असाल आणि लग्न झालं नसेल तर मग मला अशीच सासू हवी असं तुम्ही म्हणाला असाल.