VIDEO... आणि आमदाराने धरले पोलिसांचे पाय, कोरोनाचा असाही इफेक्ट

VIDEO... आणि आमदाराने धरले पोलिसांचे पाय, कोरोनाचा असाही इफेक्ट

कोरोनाशी युद्ध करण्यासाठी सर्वात आघाडीवर आहेत ते डॉक्टर्स, हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि पोलीस.

  • Share this:

हैदराबाद 1 एप्रिल :  कोरोनामुळे सर्व देशच नाही तर जग कामाला लागलं आहे. सर्व कामे बाजूला पडून सध्या सर्वच जण फक्त कोरोनाशी युद्ध लढत आहे. सगळ्या विभागांची सगळीच काम आता मागे पडली असून फक्त कोरोनाशी युद्ध करायचं हाच त्यांचा उद्देश आहे. यात सर्वात आघाडीवर आहेत ते डॉक्टर्स आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करणारे पोलीस कर्मचारी. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुकही होत आहे.

विशाखापट्टनम इथं एका आमदाराने चक्क पोलीस अधिकाऱ्यांचेच पाय धरले. हे कुठल्या कामासाठी नाही किंवा धाकामुळेही नाही तर पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे पाय धरले. अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी ही कृती केली आहे. पोलीस अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. त्यामुळे कृतज्ञता आणि आदर दाखविण्यासाठीच मी हे केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

देशातील (india) कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज दिवसभरात आतापर्यंत तब्बल 386 रुग्ण रुग्ण आढळलेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1,637 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही वाढला आहे. कोरोनाव्हायरसमुळे 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये एकाच दिवसात इतक्या झपाट्याने वाढ होण्याचे कारण निजामुद्दीन परिषद आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

First published: April 1, 2020, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading