विशाखापट्टणम, 19 डिसेंबर : लॉकडाऊनंतर सुरू झालेल्या स्टीलच्या कारखान्यात भीषण आग लागली. ही आग शुक्रवारी रात्री उशिरा लागली आहे. काही क्षणात कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी होता. आगीनंतर वितळवण्यात आलेलं स्टील खाली कोसळलं आणि आगीनं रौद्र रुप धारण केलं याच दरम्यान कारखान्यात काम करणारे 4 ते 5 कामगार या आगीत सापडले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. स्टीलमुळे आग धुमसत होती आणि पुन्हा थोड्यावेळानं भडका उडत होता. अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तर 4 ते 5 कामगारांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या स्टील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली होती. ही आग किती भयंकर होती याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
आंध्र प्रदेशात स्टील कारखान्यात अग्नितांडव आग 4 ते 5 मजूर गंभीर जखमी. आगीची भीषणता दाखवणारा VIDEO pic.twitter.com/b5Ax1CHmaN
Andhra Pradesh: At Steel Melting Shop (SMS) 2 of Visakhapatnam Steel Plant, hooks of a ladle came out and liquid steel fell on ground. Fire engines rushed to the spot. More details awaited.
मिळालेल्या माहितीनुसार वितळलेलं स्टील पडल्यामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथल्या स्टील कारखाना SMS 2 इथे ही आग लागली. स्टील वातळवण्याचे काम या कारखान्यात मोठ्या प्रमाणात केलं जात असताना ही दुर्घटना घडली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा सर्वात मोठा कारखाना आहे जिथे स्टील वितळवलं जात होतं. त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडली असून 4 ते 5 कामगार जखमी झाले आहेत.