LIVE VIDEO: हॉलेटमध्ये भीषण आग, 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा होरपळून मृत्यू

LIVE VIDEO: हॉलेटमध्ये भीषण आग, 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा होरपळून मृत्यू

कोरोनाच्या केअर सेंटरमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा LIVE VIDEO

  • Share this:

विजयवाडा, 09 ऑगस्ट: एकीकडे कोरोनाचं महासंकट असताना अनलॉक 3 मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा परिसरात एका हॉटेलमध्ये आगीचं रौद्र रुप पाहायला मिळालं. काही क्षणांत संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्षस्थानी आल्याचं पाहायला मिळालं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची भीषणता किती मोठी होती ही या व्हिडीओमधून आपल्याला दिसेल.

या आगीत 7 कोरोनाग्रस्त रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान 30 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजयवाडा इथे स्वर्ण पॅलेस नावाचं हॉटेलचं कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं होतं.

अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 7 कोरोनाग्रस्त रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 30 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. स्वर्ण पॅलेस या हॉटेलचं रुपांतर कोविड-19 केअर सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. इथे 30 रुग्ण आणि 10 स्टाफ असे लोक होते. त्यापैकी 7 जण आगीच्या भक्ष्यसाठी आले आहेत.

ही आग ग्राऊंड फ्लोअरवर लागली असून तिथून आगीनं रौद्र रुप घेतल्यानं वेगानं पसरत गेली आणि संपूर्ण हॉटेलमध्ये अग्नितांडव झाला. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले आहेत. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 9, 2020, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading