S M L

मुलावर टीका करणं बंद करा नाहीतर जसोदाबेनचा विषय काढू, चंद्राबाबूंची मोदींना धमकी

'मोदींनी चंद्राबाबूंचा मुलगा लोकेशचा उल्लेख प्रचारात केल्याने ते संतप्त झाले आहेत.'

Updated On: Feb 11, 2019 04:39 PM IST

मुलावर टीका करणं बंद करा नाहीतर जसोदाबेनचा विषय काढू, चंद्राबाबूंची मोदींना धमकी

 नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्यातल्या आरोप-प्रत्यारोपांनी आता टोक गाठलंय. आंध्राला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी चंद्राबाबूंनी सोमवारी नवी दिल्लीत उपोषण केलं. या उपोषणाच्या निमित्त पुन्हा एकदा विरोधीपक्षांची एकजुट बघायला मिळाली. आंध्र प्रदेशच्या स्वाभीमानासाठी हे उपोषण असल्याचं चंद्रबाबूंनी सांगितलं आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.


आज सकाळपासून चंद्राबाबू आंध्र भवनमध्ये उपोषणाला बसले आहेत. लखनऊला जायच्या आधी राहुल गांधी यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. फारुख अब्दुल्ला, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनीही चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. ममता बॅनर्जी तर खास कोलकत्याहून नवी दिल्लीत येणार आहेत.


रविवारी नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातल्या गुंटूर इथं सभा घेऊन चंद्राबाबूंवर टीका केली होती. चंद्रबाबू हे राज्यांच्या नाही तर आपला मुलगा लोकेशच्या भल्यासाठी काम करत असल्याची टीका त्यांनी केली होती. तर चंद्राबाबू यांनी पंतप्रधानांना धमकी देत मुलावर टीका करण्याचं बंद करा नाही तर तुमच्या पत्नीचा उल्लेख प्रचारात करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Loading...


त्यामुळे प्रचार वयक्तिक पातळीवर गेल्याचा आरोपही होतोय. राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुनच चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडले होते. तर असा दर्जा देणं घटनात्मदृष्ट्या शक्य नाही असं केंद्र सरकारचा युक्तिवाद आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा सामना आणखी रंगण्याची शक्यता आहे.

VIDEO : 'एकट्याने काम होत नाही, सामुहिक कार्याची गरज' ; गडकरींचा पुन्हा धमाका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 04:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close