• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पुराचा कहर; क्षणार्धात पाण्यासोबत वाहून गेलं दोन मजली घर, LIVE VIDEO

पुराचा कहर; क्षणार्धात पाण्यासोबत वाहून गेलं दोन मजली घर, LIVE VIDEO

अनेक गावे आणि शहरे पुराच्या (Floods) तडाख्यात अडकली आहेत. आता अशा परिस्थितीत सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.

 • Share this:
  आंध्र प्रदेश, 19 नोव्हेंबर: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) चित्तूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी (waterlogging) साचले आहे. अनेक गावे आणि शहरे पुराच्या (Floods) तडाख्यात अडकली आहेत. आता अशा परिस्थितीत सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. काही काळापूर्वी काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. ज्यामध्ये तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) रस्त्यांवरील जोरदार पाण्याच्या प्रवाहात शेकडो यात्रेकरू अडकलेले दिसत आहेत. मात्र, त्यांची सुटका करून तेथून बाहेर काढण्यात आले. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे दुमजली घरं पत्त्यासारखं पाण्यात कोसळलं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ पाहून लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये 2 घरे दिसत आहेत. काही क्षणानंतर पुराच्या पाण्यामुळे ही घरे पाण्यात बुडाली. ही घटना तिरुपतीच्या तिरुचनूर भागातील वसुंधरा नगरमधील आहे. हे भयावह दृश्य सर्वांनाच थक्क करत आहे. व्हिडिओमध्ये पुराचा तडाखा बसल्यानंतर एक दुमजली घर पत्त्यासारखे पाण्यात कोसळलं. काही वेळातच संपूर्ण घर पाण्यात बुडाले. हेही वाचा- आंदोलन मागे घेण्यासाठी राकेश टिकैत यांनी ठेवली 'ही' अट रिपोर्ट्सनुसार, हे नवीन घर असल्याचं सांगण्यात येत आहे, यात घरातल्या सर्व वस्तू वाहून गेल्या आहेत. मात्र, त्यावेळी घरात कोणीही नव्हते. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हेही वाचा-  Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेतील 5 ठळक मुद्दे आंध्र प्रदेशातील कडपाह जिल्ह्यात आज आलेल्या अचानक पुरात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आणि काही वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, चेयेरू छोट्या नदीला आलेल्या पुरामुळे काठावरील काही गावे जलमय झाली आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: