काँग्रेसची अर्थसंकल्पावर टीका, भाजप म्हणतंय राहुल गांधी PM

राहुल गांधी PM नक्की होतील नव्हे ते आधीच PM आहेत.

  • Share this:

केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक घोषणा केल्या.

यात आयकराची मर्यादा अडीच लाखांवरून 5 लाख करण्यात आली आहे. त्याचबरोबर लहान शेतकऱ्यांना पंतप्रधान मानधन योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. ते म्हणाले की शेतकऱ्यांनी दररोज फक्त 17 रूपये देऊन सरकारने चेष्टा केली आहे. कॉंग्रेसच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पावर टीका करणारे ट्विट केली आहेत.

Loading...

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देण्याच्या घोषणेवर टीका करणारं एक ट्विट काँग्रेसने केलं. या ट्विटवरून काँग्रेसला भाजपने घेरलं आहे.

सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार म्हणजेच महिन्याला फक्त 500 रुपये देणार असं सांगत काँग्रेसने आश्वासन आणि प्रत्यक्षात हाती काय येणार हे सांगणारे ग्राफिक पोस्ट केले. त्यावर आंध्र प्रदेश भाजपने फिरकी घेत प्रत्युत्तर दिलं आहे.

आंध्र प्रदेश भाजपनं म्हटलं की हे ग्राफिक राहुल गांधींनी तयार केलं असावं. वर्षाला 6 हजार म्हणजे महिन्याला 500 रुपयेच होणार. यात वेगळं काय आहे.

काँग्रेसचा बुद्ध्यांक शून्य असून एक दिवस राहुल गांधी PM नक्की होतील. थांबा राहुल गांधी आधीच PM आहेत. PM म्हणजे Poor In Maths असं ट्विट आंध्र प्रदेश भाजपने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...