• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • भीषण! लॉरीच्या धडकेत रिक्षा ड्रायव्हर जागीच ठार, आणखी पाच जणांचा मृत्यू

भीषण! लॉरीच्या धडकेत रिक्षा ड्रायव्हर जागीच ठार, आणखी पाच जणांचा मृत्यू

आंध्रप्रदेश राज्यातून एक भीषण (Andhra Pradesh Accident) अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघात इतका भयंकर होता की यामध्ये 6 जण ठार तर आणखी 6 जखमी झाले आहेत.

  • Share this:
कृष्णा, 14 मार्च: आंध्रप्रदेश राज्यातून एक भीषण (Andhra Pradesh Accident) अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघात इतका भयंकर होता की यामध्ये 6 जण ठार तर आणखी 6 जखमी झाले आहेत. एका लॉरीने ऑटोरिक्षाला (Auto Rickshaw Accident) उडवल्याने ही घटना घडली. आंध्रप्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी गोलपल्ली गावाजवळ भीषण अपघात झाला आणि स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जखमींवर विजयवाडा याठिकाणी असणाऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेमध्ये ऑटोरिक्षाचालक जागीच ठार (Auto Rickshaw Driver Killed in Accident) झाला आहे. दरम्यान लॉरी ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेल्या व्यक्तींची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती स्थानिक मीडिया अहवालांमधून समोर आली आहे. ऑटोरिक्षामध्ये ड्रायव्हरसह एकूण 12 लोकं होते. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉरी ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी तो पसार झाल्याची माहितीही समोर आली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. या अपघाताचे समोर आलेले फोटो देखील विचलीत करणारे आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published: