या नेत्याने एअरपोर्टवर एकाला केली 20 लाख रुपयांची मदत

राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या योजना जाहीर करून नागरिकांना लाखो रुपयांची मदत देत असतात. पण आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्टवर भेटलेल्या एका व्यक्तीला कॅन्सरच्या इलाजासाठी 20 लाख रुपयांची मदत केली.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 03:54 PM IST

या नेत्याने एअरपोर्टवर एकाला केली 20 लाख रुपयांची मदत

मुंबई, 5 जून : राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या योजना जाहीर करून नागरिकांना लाखो रुपयांची मदत करत असतात. कधी शेतकऱ्यांना तर कधी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत जाहीर केली जाते. पण समोर आलेल्या एका गरजू व्यक्तीला मुख्यमंत्री लगेच मदत देऊ करत असतील तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल.

आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी एअरपोर्टवर मदत मागणाऱ्या एका व्यक्तीला 20 लाख रुपये दिले. ही व्यक्ती कॅन्सरच्या इलाजासाठी प्लेकार्ड घेऊन मदत मागत होती.

कॅन्सरच्या इलाजासाठी मदत

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, 15 वर्षांच्या नीरजला कॅन्सर झाला आहे. नीरजवर इलाज करायचे असतील तर त्यासाठी 20 लाख रुपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. नीरज यांच्या कुटुंबीयांकडे एवढे पैसे अर्थातच नव्हते.

बराच संघर्ष करून नीरजचे आई वडील, भाऊ आणि मित्रांनी काही पत्रकं बनवली आणि नीरजच्या इलाजासाठी पैसे जमवणं सुरू केलं. तरीही पुरेसे पैसे जमले नाहीत. त्याचवेळी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांची नजर त्यांच्यावर पडली.

Loading...

त्यांनी नीरजच्या वडिलांना एअरपोर्टवर जाऊन मदतीचं आवाहन करण्याचा सल्ला दिला. एअरपोर्टवर मोठमोठे लोक येतजात असतात त्यामुळे तिथे मदत मागा असं त्यांनी त्यांना सांगितलं.

जगनमोहन रेड्डींचं गेलं लक्ष

ही मात्रा लागू पडली. जेव्हा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी एअरपोर्टवरून जात होते तेव्हा 25-30 लोकांना असे बॅनर घेऊन उभं असलेलं त्यांनी पाहिलं. त्यांनी लगेचच सरकारी खर्चातून नीरजचे उपचार करण्याचे आदेश दिले.

याआधीही जगनमोहन रेड्डी यांनी वृद्ध व्यक्तींची पेन्शन वाढवण्याचे आदेश दिले होते. त्याचसोबत 4 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांची ग्राम सचिवालयात नियुक्ती करावी,अशीही योजना जगनमोहन रेड्डी यांनी आणली.

आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांनी 175 पैकी 151 जागा मिळवत घवघवीत यश मिळवलं.यानंतर आता त्यांनी झपाट्याने कामाला सुरुवात केली आहे.

=====================================================================================

VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...