...आणि चोराने केला कहर, चोरी करणाऱ्या घरातच दारु पिऊन झोपला

...आणि चोराने केला कहर, चोरी करणाऱ्या घरातच दारु पिऊन झोपला

सकाळी कोणीतरी आपल्याला उठवत असल्याचं त्याच्या लक्षात आलं, डोळे उघडतो तर...

  • Share this:

मंगळुरू, 27 फेब्रुवारी : चोरी केल्यानंतर अनेकदा चोर आपल्या मागे काहीतरी पुरावा सोडून जात असल्याचं आपण अनेकदा ऐकलं आहे. मात्र मंगळुरुमध्ये एक अजबच घटना घडली आहे. येथे चोरी करण्यासाठी घरात घुसलेला एक चोर परतण्याचच विसरुन गेला. रात्री एका व्यावसायिकाच्या घरात चोरी करण्यासाठी  गेलेला चोर घरातच झोपून राहिला. सकाळी डोळे उघडले तर त्याच्या समोर घराचा मालक कमरेवर हात ठेवून उभा होता. त्यांना पाहून चोराची पुरती झोपच उडाली. रात्री दारु पिऊन चोरी करण्यासाठी चोर घरात शिरला.

दारूच्या नशेत एक चोर उप्पिननगाडी येथे एक व्यावसायिकाच्या घरात चोरी करण्यासाठी पोहोचला. छतावरील टाइल्स हटवून तो घरात दाखल झाला आणि तेथेच झोपी गेला. कपाटाच्या किल्ल्या त्याच्या हातातच होत्या. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा घराचा मालक त्याच्या समोर उभा होता. त्यानंतर व्यावसायिकाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्याविरोधात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे.

नशेत तेथेच झोपी गेला

पोलिसांनी सांगितले की बिहारचे माजीपुराचा अनिल साहनी (34) दारुच्या नशेत सुदर्शन यांच्या घरात दाखल झाले. तो पहिल्यांदा कंपाऊंडच्या भिंतीवर चढला आणि घराच्या छतावरील टाइल्स काढून घरात शिरला. घरात सर्वजण झोपले होते. साहनी घरात शिरला आणि त्याने सामान तपासले. त्यात त्याला कपाटाच्या चाव्या सापडल्या. तो इतक्या नशेत होता की चाव्या घेऊन तो घरातच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी घराच्या मालकाने त्याला झोपेतून जागं केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: thief
First Published: Feb 27, 2020 12:52 PM IST

ताज्या बातम्या