रामदास कदम मला संपवायला निघाले होते, अनंत गीतेंचा गौप्यस्फोट

रामदास कदम मला संपवायला निघाले होते, अनंत गीतेंचा गौप्यस्फोट

रामदास कदम तुम्ही मला संपवण्याची शपथ घेतली होतीत मात्र मी तुमच्या मुलाला आमदार बनवण्याची शपथ घेतो.

  • Share this:

09 जून : रामदास कदम तुम्ही मला संपवण्याची शपथ घेतली होतीत मात्र मी तुमच्या मुलाला आमदार बनवण्याची शपथ घेतो. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं आहे. गीते यांच्या या वक्तव्यमुळे रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यामधल्या जुना वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मला विरोधकांबरोबर पक्षातील लोकांसोबतही लढावं लागल्याचं गीतेंनी यावेळी सांगीतलं. रामदास कदम यांनी तर मला पाडण्याची पूर्ण तयारीच केली होती. असंही गीते म्हणाले.

रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याची शपथ घेतली होती. लोकसभा निवडणुकीत मला पाडण्याचे त्यांनी ठरवले होते. पण मी विरोधकांबरोबर स्वकीयांच्या विरोधात लढलो आणि जिंकून आलो, असा गौप्यस्फोट अनंत गिते यांनी केला.

औरंगाबादच्या शिवसेना शाखेच्या ३३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अनंत गिते बोलत होते. यावेळ‌ी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2018 01:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading