आनंदीबेन पटेल UPच्या राज्यपाल, धनखड ठेवणार 'दीदीं'च्या कारभारावर लक्ष

आनंदीबेन पटेल UPच्या राज्यपाल, धनखड ठेवणार 'दीदीं'च्या कारभारावर लक्ष

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे निवृत्त झालेत. त्यांचं वय 85 वर्षांचं आहे त्यामुळे त्यांना आराम देण्यात आलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 20 जुलै : केंद्र सरकारने देशातल्या विविध राज्यांमध्ये राज्यपालांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे निवृत्त झालेत. त्यांचं वय 85 वर्षांचं आहे त्यामुळे त्यांना आराम देण्यात आलाय. तर मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सर्वांच लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखड यांची नियुक्ती करण्यात आलीय.

नरेंद्र मोदी यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यावर राज्यपालांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसारच अनेक राज्यांच्या राज्यपालपदी नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांना मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलंय. तर पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखड यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्रिपुराचं राज्यपालपद रमेश बैस यांना देण्यात आलंय. फागू चौहान हे बिहारचे नवे राज्यपाल असतील. नागालँडच्या राज्यपालपदी एन.रवी यांची नियुक्ती करण्यात आलीय.

रेल्वेची नवी योजना, तिकीट बुक करताना मिळेल 'हा' नवा पर्याय

पश्चिव बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका असल्यानं त्या ठिकाणी राज्यपालदी कोण नियुक्त होते याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. धनखड हे सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकिल आहेत. 2003मध्ये ते काँग्रेससोडून भाजपमध्ये आले होते. राज्यस्थानातून ते खासदार म्हणून निवडूनही आले होते.

पंतप्रधानांना पाठवा तुमच्या कल्पना

15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी अवधी राहिला आहे. यावर्षी पंतप्रधान मोदी सहाव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण करणार आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणात काय मुद्दे असावेत याबद्दलच्या सूचना त्यांनी नागरिकांकडे मागवल्या आहेत.

VIDEO: मृत्यू जवळ येत होता आणि हे आजोबा जीव मुठीत धरून बसले होते

याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केलं आहे. 15 ऑगस्टच्या भाषणासाठी तुमच्या बहुमूल्य सूचना तुम्ही आम्हाला पाठवू शकता. या सूचनांचा अंतर्भाव भाषणामध्ये करण्यात आम्हाला आनंदच वाटेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जर तुम्ही सूचना पाठवल्यात तर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाच्या रूपात 130 कोटी भारतीय तुमचे विचार ऐकतील, असंही यात लिहिलं आहे.या भाषणासाठीच्या सूचना नमो अ‍ॅपवर तयार करण्यात आलेल्या ओपन फोरममध्ये पाठवायच्या आहेत.

First published: July 20, 2019, 3:11 PM IST

ताज्या बातम्या