Home /News /national /

'हे आमच्या...', SUV Showroom मध्ये शेतकऱ्याचा तो VIDEO पाहताच Anand Mahindra काय म्हणाले पाहा

'हे आमच्या...', SUV Showroom मध्ये शेतकऱ्याचा तो VIDEO पाहताच Anand Mahindra काय म्हणाले पाहा

महिंद्रा शोरूममध्ये शेतकऱ्यासोबत घडलेला तो प्रकार आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यापर्यंत पोहोचला आणि ते सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत.

    बंगळुरू, 25 जानेवारी : महिंद्राचं नाव सध्या चर्चेत आलं ते एका व्हिडीओमुळे. महिंद्राच्या एका शोरूममध्ये शेतकऱ्याचा अपमान करण्यात आला (Humiliation in Mahindra's SUV Showroom). त्यानंतर सर्वत्र महिंद्राची चर्चा होऊ लागली. नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे या कंपनीचे आनंद महिंद्रा  (Anand Mahindra) यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि ते याबाबत सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. महिंद्राच्या शोरूममध्ये एका शेतकऱ्याचा अपमान केल्याबाबत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,  "@MahindraRise चा मुख्य उद्देश आमच्या समुदायांना आणि सर्व स्टेकहोल्डर्सचा प्रगतीसाठी सक्षम करणं आणि मुख्य मूल्य म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा राखणं. या तत्त्वज्ञानाला कोणीही तडा लावत असेल तर त्याची तात्काळ दखल घेतली जाईल" आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ विजय नाकरा यांचं ट्विट रिट्विट करत असं म्हटलं आहे. ज्यात नाकरा यांनी या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. हे वाचा - लज्जास्पद!5 हजारांची लाच दिली नाही म्हणून गर्भवतीला काढलं रुग्णालयाबाहेर, मृत्यू काय आहे नेमकं प्रकरण? कर्नाटकातील तुमकुरूतील महिंद्रा शोरूममध्ये एका शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. कॅम्पेगौडा नावाचा हा शेतकरी आपल्या मित्रांसोबत महिंद्राच्या एसयूव्ही शोरूममध्ये गाडी खरेदी करायला गेला. तिथल्या सेल्समनने त्याचे कपडे पाहून त्याचा अपमान केला. "10 लाख रुपये दूर तुझ्या खिशात 10 रुपयेही नसतील", असं सेल्समन त्याला म्हणाला. त्यावर शेतकरी संतप्त झाला आणि जर पैसे आणून दिले तर आताच कारची डिलीव्हरी देणार का? असं विचारत अवघ्या 30 मिनिटांतच शेतकरी आणि त्याच्या मित्रांनी 10 लाख रुपयांची कॅश घेऊन शोरूममध्ये पुन्हा आले. हे वाचा - Padma Awards : पुनवाला, बालाजी तांबे आणि बावस्करांचा पद्म पुरस्काराने सन्मान या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महिंद्रा शोरूममध्ये करण्यात आलेल्या या भेदभावाची चर्चा रंगू लागली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Anand mahindra, Viral, Viral videos

    पुढील बातम्या