पुन्हा एकदा आनंद महिद्रांच्या 'या' ट्विटची चर्चा

पुन्हा एकदा आनंद महिद्रांच्या 'या' ट्विटची चर्चा

आनंद महिंद्र यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : उद्योगपती आनंद महिंद्रा हल्ली ट्विटरवर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर ते एखादी भन्नाट  पोस्ट शेअर करत आहेत.

रविवारीदेखील (7 एप्रिल)त्यांनी घोड्यावर स्वार झालेल्या एका शाळकरी मुलीचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. महिंद्रा यांनी युझर मनोज कुमार यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. मनोज यांनी ट्विटर पोस्टवर म्हटलं आहे की, 'ही व्हिडीओ क्लिप मला व्हॉट्सअॅपवर मिळाली होती. ज्यामध्ये केरळच्या त्रिसूरमध्ये एक विद्यार्थिनी चक्क घोड्यावर स्वार होऊन इयत्ता दहावीची परीक्षा देण्यासाठी जात आहे'

हेच ट्विट रिट्विट करत महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, 'शानदार! ही क्लिप व्हायरल झाली पाहिजे. हा देखील अतुल्य भारत आहे. त्रिसूरमध्ये या मुलीला कोण ओळखतं का? ही विद्यार्थिनी माझ्यासाठी हिरो आहे.

यापूर्वी महिंद्रा यांनी एक गाडी खरेदी केली होती. या गाडीचं नामकरण करण्यासाठी त्यांनी नेटीझन्सचा सल्लादेखील मागितला होता.

VIDEO : पक्ष्यांसाठी पाण्याची सोय, तरुणांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 02:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading