मराठी बातम्या /बातम्या /देश /

आनंद महिंद्रांचा Twitter वर प्रश्न, योग्य उत्तर देणाऱ्याला मिळणार जावा बाईक जॅकेट

आनंद महिंद्रांचा Twitter वर प्रश्न, योग्य उत्तर देणाऱ्याला मिळणार जावा बाईक जॅकेट

भारताचे आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) खूप अ‍ॅक्टिव्ह असतात.

भारताचे आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) खूप अ‍ॅक्टिव्ह असतात.

भारताचे आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) खूप अ‍ॅक्टिव्ह असतात.

    मुंबई, 7 डिसेंबर : भारताचे आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. लोकांशी संपर्कात राहण्यासाठी ते वेगवेगळ्या पोस्ट्स शेअर करत असतात. मजेदार पोस्टमुळे आनंद महिंद्रा यांचं खूप चांगलं फॅन फॉलोइंग आहे. या वेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर काही फोटो ट्विट केले आहेत. या प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्यास जावा बाईक जॅकेट (Jawa Bike Jacket Unisex) देण्याचे आश्वासनही महेंद्रा यांनी दिले आहे. ट्विटर युझर्ससाठी संडे क्विझ हे फोटो शेअर करताना महिंद्रा अँड महिंद्रा इंडस्ट्रीज ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, 'तुमच्यासाठी संडे क्विझ. हल्लीच्या काळात भारतीय वंशाच्या लोकांनी राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात जागतिक पातळीवर मोठी किर्ती मिळवली आहे. या 12 जणांपैकी किती जणांची नावे तुम्ही सांगू शकता? अचूक उत्तर देणाऱ्याला जावा बाइक जॅकेट (युनिसेक्स) मिळेल. उद्या विजेत्याची घोषणा केली जाईल. छतावर स्कॉर्पिओची टाकी, महिंद्रा म्हणाले... हल्लीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये इन्तसर आलम नावाच्या व्यक्तीने बिहारच्या भागलपूरमध्ये घराच्या छतावर स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी बनवली आहे. आनंद महिंद्रा याबद्दल म्हणाले होते की, 'मी पुढे जाण्याची कहाणी म्हणेन ... स्कॉर्पिओ राइझिंग टू द रूफटॉप'. या मालकाला माझा सलाम. त्यांच्या पहिल्या कारबद्दलच्या त्यांच्या आपुलकीला आम्ही सलाम करतो!' कर्मचाऱ्याचा व्हिडिओ पाहून महिंद्रा भावुक महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडच्या (Maharashtra State Electricity Transmission Company Ltd.) कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा भावुक झाले आणि म्हणाले की आता वीज सेवांबद्दल तक्रार करण्यापूर्वी ते बर्‍याचदा विचार करतील. या व्हिडिओत तो कर्मचारी वीज पोहोचवण्यासाठी किती कष्ट करतो हे दिसत होतं. त्यामुळे महिंद्रा म्हणाले की त्याची जिद्द, कष्ट पाहून तक्रार करणारे विचार करून त्यांची भूमिका मांडतील.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या