नवी दिल्ली, 25 एप्रिल : महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी रुग्णालयात कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी एक आयडिया सुचवली आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, की जोपर्यंत कंपन्यांना कोरोना लसीचा थेट पुरवठा होत नाही, तोपर्यंत या कंपन्या बाहेरच मोकळ्या जागेत कॅम्प सुरू करून रुग्णालयांना मदत करू शकतात. यामुळे रुग्णालयांमधील इतर कामही बंद राहाणार नाहीत आणि बाहेर कॅम्प उभारून अधिकाधिक लोकांना लस देणंही शक्य होईल.
एका स्थानिक डॉक्टरद्वारा देण्यात आलेल्या योजनेमध्ये त्यांनी सांगितलं की, स्थामिक क्लबसह मिळून, खुल्या जागेवर कोरोना लसीकरणाची सुरुवात केली जाऊ शकते. असं केल्याने कोरोना संक्रमणापासूनही बचाव होऊ शकतो आणि लसीकरणालाही गती मिळू शकते.
मोठ्या शहरांत असं केलं जाऊ शकतं लसीकरण -
मोठ्या शहरांमध्येही कंपन्या आपल्या खुल्या जागांवर लसीकरणाची अपेक्षा करत आहेत. परंतु लशींच्या कमी उत्पादनामुळे जिल्हा रुग्णालय आणि राज्य रुग्णालयांना प्राथमिकता दिली जात आहे. जोपर्यंत कंपन्यांना थेट लशीची पुरवठा होत नाही, तोपर्यंत आम्ही रुग्णालयांना अशी शिबिरं लावण्यासाठी आर्थिक मदत करू शकतो, असंही ते म्हणाले.
A Doctor from a local Hospital told me of plans to work with local clubs to utilise their open spaces for creating vaccination camps. It allows efficient handling of larger numbers & prevents the vaccine drive from intruding on the hospital’s regular activities. (1/3)
— anand mahindra (@anandmahindra) April 22, 2021
दरम्यान, सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात आला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. भारतात सध्या 26,82,751 लोक कोरोना संक्रमित आहेत. मृतांची संख्या 1,92,311 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1,40,85,311 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus