एकट्यानं 3 किमी कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला आनंद महिंद्रांनी दिलं मोठं गिफ्ट

एकट्यानं 3 किमी कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला आनंद महिंद्रांनी दिलं मोठं गिफ्ट

पाण्याची अडचण लक्षात घेऊन ती सोडवण्यासाठी लौंगी भुईया यांनी पुढाकार घेतला.

  • Share this:

पाटणा, 21 सप्टेंबर : शेतीच्या सिंचनासाठी गेल्या 30 वर्षांपासून एकट्याने 3 किलोमीटरचा कालवा खोदणारे बिहारमधील शेतकरी लौंगी भुईया सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या या कार्याची उद्योजक आनंद महिंद्रा यांनी दखल घेत त्यांना महिंद्राचा ट्रॅक्टर भेट दिला आहे. ' भुईंयांसारख्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर भेट देणं ही मी भाग्याची गोष्ट समजतो, असं ट्वीटही आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

बिहारमधील गया जिल्ह्यातील लाथुआ भागात असलेल्या कोठीलावासह 3 गावांना पाण्याची अडचण होती. ही अडचण सोडवण्यासाठी, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी लौंगी भुईया यांनी पुढाकार घेतला. फुकटची हमाली का करतो असं म्हणत सर्वांनी त्यांना विरोध केला. कुटुंबियांनीही साथ दिली नाही. अशा स्थितीतही भविष्यातील गरज ओळखून भुईया यांनी आपले काम सातत्याने सुरू ठेवले. काम संपल्यानंतर ते आपली कुदळ झाडाझुडपांत लपवून ठेवायचे. डोंगरावरून खाली येणारं पाणी वाहून नदीत जात होतं. मात्र, भुईया यांनी 3 किमीचा कालवा खोदून हे पाणी गावातील शेतांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे 3 गावांतील लोकांना या पाण्याचा उपयोग होतो आहे. आधी त्यांना विरोध करणारे आता हे पाणी बघून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हे वाचा-खराब हवामान की, वीज पडली? शेतात कोसळले विमान, पायलट जागीच ठार

दरम्यान, बिहारमधीलच दशरथ मांझी यांनी डोंगर फोडल्याचं सर्वश्रूत असतानाच मांझी समाजातील दुसऱ्या व्यक्तीने असे एकट्याने मोठं कष्टाचं काम एकट्याने करून दाखवले आहे. त्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

पत्रकार रोहिन कुमार यांनी लौंगी भुईया यांनी केलेल्या या कार्याबद्दल Twitter वर एक संदेश पोस्ट केला होता. त्यात लौंगी यांच्यासोबत कालव्याजवळ फोटो काढून त्यांना केवळ एक ट्रॅक्टर मिळावा अशी त्यांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. रोहिनने हा मेसेज महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना Tag केले होते. महिंद्राने त्याची तातडीने दखल घेत तत्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांना भुईया यांना मोफत ट्रॅक्टर देण्यास सांगितले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी भुईया यांना ट्रॅक्टर दिला.' मला ट्रॅक्टर मिळावा हे माझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आता मी आणखी जोमाने काम करू शकेन. मी खूप आनंदी आहे,' अशी प्रतिक्रिया भुईया यांनी ट्रॅक्टर मिळाल्यावर व्यक्त केली.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 21, 2020, 4:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading