आनंद महिंद्रांंबरोबरच डाबर ग्रुपचा स्तुत्य उपक्रम, वाचून तुम्हीही कराल कौतुक

आनंद महिंद्रांंबरोबरच डाबर ग्रुपचा स्तुत्य उपक्रम, वाचून तुम्हीही कराल कौतुक

आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या पोस्टमधून एक चांगला संदेश पोहोचवत असतात.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असताना अनेक हात मदतीसाठी पुढे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आवाहन करताच अनेक अभिनेते, उद्योगपती यांनी कोटी रुपयांनी मदत केली आहे. यातच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष (Anand Mahindra) आनंद महिंद्रा नेहमीच सामाजिक कामात पुढे असतात. याशिवाय आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे प्रत्येक टि्वट हा विविध सकारात्मक चर्चा घडवून आणत असतो. कारण त्यामध्ये एक संदेश दडलेला असतो.

आनंद महिंद्रा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदत केली आहे. तर देशातील अनेक भागांमध्ये ते गरजूंना पोटभर अन्न पूरवित आहेत. अशातच त्यांनी केलेलं एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, माझा एक मित्र निवृत्त पत्रकार पद्ममा रामनाथ यांनी मला काल मेल केला आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या कँटीनमध्ये अन्न हे स्टिलच्या ताटात देण्याऐवजी केळीच्या पानावर देण्याची सूचना केली. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र या उपक्रमामुळे केळीचं उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याला मदत होईल. आमच्या फॅक्टरीच्या टीमने या स्त्यूत्य उपक्रमाची अंमलबजावणी केली व कंपनीतील कँटीनमध्ये केळीच्या पानावर अन्न वाढण्यास सुरूवात केली आहे.

त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आनंद महिंद्रा कायमच असे लोकोपयोगी कार्यक्रम चालवित असतात त्यामुळे त्यांच्याविषयी आदर दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

आनंद महिंद्रांसारखे अनेक उद्योपती सध्या देश संकटात असताना मदतीसाठी पुढे आल्या आहेत. आता डाबर ग्रुपनेदेखील डाबर केअर फंड याची स्थापना केली आहे. या अंतर्गत तब्बल 21 कोटी रुपयांची मदत कोरोनाग्रस्तांवरील वैद्यकीय उपचार, गरजूंसाठी उपलब्ध केली आहे. याशिवाय डाबर इंडिया लिमिटेड आणि इतर  11 कोटी रुपयांची मदत पीएम केअर्स फंडमध्ये देण्यात आली आहे. आपण समाजाचं देणं लागतो याची आम्हाला याची जाणीव आहे. त्यामुळे कोविड - 19 या संकटाच्या काळात पाठिंबा देण्यासाठी, कोरोना योद्ध्यांची काळजी घेण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे डाबर इंडिया लिमिटेडचे ​​अध्यक्ष अमित बर्मन म्हणाले.

संबंधित - वाघाला कोरोना झाल्यानं शेतकरी घाबरला, शेळ्यांची 'अशी' घेतोय काळजी

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: April 9, 2020, 7:32 PM IST

ताज्या बातम्या