Analysis : राहुल गांधी वायनाडमधून लढल्यास भाजपला फायदा?

राहुल गांधी वायनाडमधून लढत असले तरी त्याचा फायदा काँग्रेसऐवजी भाजपला होणार की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 12:34 PM IST

Analysis : राहुल गांधी वायनाडमधून लढल्यास भाजपला फायदा?

वायनाड, के. बेनेडिक्ट, 01 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाडमधून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यावर आता डाव्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. काँग्रेसला उभारी देण्यास दक्षिण भारतानं मोठा हातभार लावला आहे असं इतिहासामध्ये पाहिल्यानंतर दिसून येतं. पण, आता काँग्रेसच्या फायद्याऐवजी राहुल गांधी यांच्या या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणं देखील तशीच आहेत. दक्षिण भारतामध्ये लोकसभेच्या 130 जागा येतात. राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. पण, सत्ता स्थापनेची वेळ आल्यास काँग्रेसला डावे साथ देणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.


काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवं आव्हान


काय आहे काँग्रेसपुढील आव्हान

Loading...

2008मध्ये वायनाड या मतदारसंघाची स्थापना झाली. 8 लाख मतदार संख्या असलेल्या वायनाडमध्ये 50 टक्के हिंदु,  28.65 टक्के मुस्लिम आणि 21 टक्के ईसाई आहेत. 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला होता. काँग्रेस खासदार एम. एल. शहनवाझ यांचं निधन झाल्यामुळे सध्या वायनाडची जागा रिकामी आहे. 2009मध्ये काँग्रेसला 50 टक्के मिळाली होती. तर, 2014मध्ये काँग्रेसला 41 टक्के पेक्षा जास्त मतं मिळाली होती.2014मध्ये काँग्रेसला 20,870 मताचं मताधिक्य मिळालं होतं. या दोन्ही वेळी सीपीएमला पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवाय, राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे देखील आता डावे नाराज आहेत.


दक्षिण भारत काँग्रेससाठी लकी! इतिहासाची पुनरावृत्ती होणार?


मोदी विरोधी मोहिमेला लगाम

राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे मोदी विरोधी मोहिमेला खिळ बसत असल्याची भावना डाव्यांची झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील काँग्रेस- डाव्यांची आघाडी झाली नाही. दक्षिण भारतात कर्नाटक व्यतिरिक्त भाजपची ताकद नाही. अशा वेळी देशात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये 150 पेक्षा जास्त जागा जिंकल्यास काँग्रेसला भाजपविरोधकांची मदत लागेल. त्यामुळे केरळमध्ये काँग्रेसनं प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केल्यास डावे नाराज होतील. त्यामुळे निवडणुकीनंतर गरज पडल्यास सत्ता स्थापन करताना डाव्यांच्या नाराजीचा काँग्रेसला फटका बसू शकेल. या साऱ्या बाबी लक्षात घेता वायनाडमधून राहुल गांधी लढत असल्याचा फायदा नेमका कुणाला होणार? यावर आता खल सुरू झाला आहे.


'मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...