मोदी-शहा यांच्या वॉररूममधली 'इनसाईड' स्टोरी : भाजप 303 वर पोहोचण्याचा 'हा' होता प्लॅन!

भाजपला 200 जागा मिळतील असे भाकित केले होते आणि हे भाकित खरे देखील ठरले असते. पण....

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 08:41 PM IST

मोदी-शहा यांच्या वॉररूममधली 'इनसाईड' स्टोरी : भाजप 303 वर पोहोचण्याचा 'हा' होता प्लॅन!

नवी दिल्ली, 24 मे: भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर मोदी आणि शहा यांच्या राजकीय कौशल्याची चर्चा सुरु झाली आहे. अनेक एक्झिट पोल आणि राजकीय तज्ज्ञांचा अंदाज चुकवत भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. निवडणुकीच्या निकाला आधी अनेकांनी भाजपला 200 जागा मिळतील असे भाकित केले होते आणि हे भाकित खरे देखील ठरले असते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी असा एक निर्णय घेतला ज्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्रच पालटले. मोदी-शहा यांच्या त्या एका निर्णयामुळेच भाजपला 303 जागा मिळाल्या.

नोटाबंदी, राफेल करारावरून विरोधकांची टीका, जीएसटी अशा एक ना अनेक मुद्दयावरून विरोधकांनी मोदी सरकारचा समाचार घेतला होता. त्यात काही मित्र पक्षांनी देखील साथ सोडली होती. या सर्व परिस्थितीत मोदी-शहा जोडीने एक कोठोर निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे विद्यमान खासदारांना घरी बसवण्याचा होय.


2014च्या मोदी लाटेत विजय झालेल्या ज्या खासदारांची कामगिरी चांगली नव्हती त्यांना अमित शहा यांनी उमेदवारी दिली नाही. शहा यांना याची पुर्ण कल्पना होती या जागांवर पुन्हा विजय मिळणार नाही. त्यामुळेच त्यांनी देशातील 84 मतदारसंघात उमेदवार बदलले. अशाच प्रकारे NDAने मिळून 103 खासदारांना घरी बसवले आणि त्यांच्या मतदारसंघातून नव्या चेहऱ्याला संधी दिली.

सर्व राज्यांचे निकाल एका क्लिकवर, पाहा कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळाल्या

Loading...


'संघा'च्या या नेत्याला वाटतं काँग्रेसला 100 जागा मिळायला हव्या होत्या


काल 23 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर आलेल्या माहितीनुसार 103 जागांपैकी भाजपने 94 जागांवर विजय मिळवला आहे. त्यातील 84 खासदार भाजपचे आहेत. याचाच दुसरा अर्थ असा होतो की जर भाजपने विद्यमान खासदारांना बदलले नसते तर निश्चितपणे त्या जागांवर पराभव झाला असता आणि त्यांचे 2019मधील संख्याबळ 303वरून 203 इतके झाले असते. भाजपचे चाणक्य अशी अमित शहांची ओळख आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या काही विधानसभा निवडणुकीत ही बाब दिसून आली होती. पण यावेळी अमित शहा यांनी पक्षाला 2014पेक्षा मोठे यश मिळवून दिले.


VIDEO: धर्मात तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले- सुशीलकुमार शिंदे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...