लग्नाच्या आधी ठेवले शारीरिक संबंध, युवकाला मिळाली गंभीर शिक्षा

लग्नाच्या आधी ठेवले शारीरिक संबंध, युवकाला मिळाली गंभीर शिक्षा

या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अशा प्रकारे शिक्षा केल्याबद्दल जगभरातून यावर टीका होत आहे.

  • Share this:

इंडोनेशिया, 06 डिसेंबर : गुरुवारी इंडोनेशियातील एका व्यक्तीला विवाहपूर्व लैंगिक संबंधाबद्दल कठोर शिक्षा देण्यात आली आहे. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे चाबूक मारुन व्यक्तीला शिक्षा देण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे चाबूक मारल्यानंतर तरूण बेहोश झाल्यानंतरही त्याच्यावर चाबूक मारण्यात आले. या बातमीची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.

या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अशा प्रकारे शिक्षा केल्याबद्दल जगभरातून यावर टीका होत आहे, परंतु या देशाच्या इस्लामिक कायद्यानुसार बंदी घातलेल्या सर्व कृतींसाठी अशी शिक्षा देणे इथे सामान्य आहे. जुगार, मद्यपान, समलिंगी किंवा विवाहपूर्व लैंगिक संबंधांना येथे गुन्हा मानले जाते.

जगातील सर्वात मोठा मुस्लिम बहुल देश इंडोनेशियात धार्मिक कायदा लागू आहे. गुरुवारी, 22 वर्षीय मुलाला 100 चाबूकांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याने शरिया अधिकाऱ्याकडे विनवणी केली पण ते सर्व तटस्थ राहिले. आणि त्याला 100 चाबूकांनी मारण्यात आलं. अगदी तरुण गंभीर जखमी होईपर्यंत त्याच्यावर चाबूकांचा मारा देण्यात आला.

इतर बातम्या - हैदराबाद प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्याआधीच पोलिसांनी केला एन्काऊंटरचा प्लान

चाबूकाने मारल्यानंतर तरुण बेशुद्ध झाला, तेव्हा त्याला तात्काळ वैद्यकीय सेवा दिली आणि नंतर पुन्हा चाबकाने मारण्यास सुरवात केली. नंतर त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली की त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल या तरूणाला दोषी ठरविण्यात आले. या महिलेला 100 चाबूक मारण्याची शिक्षाही देण्यात आली.

इतर बातम्या - लग्नात डान्सर तरुणीवर झाडली गोळी, घटनेचा VIDEO मोबाईलमध्ये कैद

जेव्हा तरूणाला चाबकाचे फटके दिले जात होते, तेव्हा जवळपास 500 लोक ते तेथे पाहत होते आणि 'आणखी जोरात मारा' असं ओरडत होते. जुलैमध्येही तीन जणांना विवाहपूर्व लैंगिक संबंधासाठी 100 चाबूक खाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोघांना अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. अन्य गुन्ह्यांसाठी डझनभर किंवा त्याहून कमी चाबूक मारले जातात.

इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनीही जाहीरपणे अशी शिक्षा रद्द करण्याचे सांगितले आहे, परंतु एसेचच्या मुस्लिम लोकांमध्ये अशी शिक्षा अजूनही प्रचलित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Indonesia
First Published: Dec 7, 2019 08:51 AM IST

ताज्या बातम्या