Home /News /national /

'या' शहरात होतेय अनोख्या मंडळाची चर्चा; देवीच्या जागी बसवणार प्रवासी महिलेची मूर्ती

'या' शहरात होतेय अनोख्या मंडळाची चर्चा; देवीच्या जागी बसवणार प्रवासी महिलेची मूर्ती

या मंडळाने इतर देवींच्याही मूर्ती बसवल्या नसून त्यांच्या जागी प्रवासी महिलांच्या मुलांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.

  कोलकाता, 16 ऑक्टोबर : देशभरात लवकरच नवरात्रोत्सोवाला सुरुवात होणार आहे. पुढील काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये दुर्गा देवीची स्थापना केली जाणार आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) दुर्गा पूजा हा केवळ सण नसून, तिथल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील विविध मूर्तीकार पश्चिम बंगालबरोबरच बिहार, झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील मूर्ती बनवताना. पश्चिम बंगालमधील अनेक मंडळे दरवर्षी विविध प्रकारचा सामाजिक संदेशदेखील देत असतात. यंदाही येथील मंडळाने खास निर्णय घेतला आहे. दक्षिण कोलकातामधील (South Kolkata) बेहाला (Behala) परिसरातील एका मंडळाने (Durga Puja committee) दुर्गा देवीच्या मूर्तीऐवजी प्रवासी मजूर महिलेची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे मंडळ चर्चेचा विषय ठरले आहे. या मंडळाने इतर देवींच्याही मूर्ती बसवल्या नसून त्यांच्या जागी प्रवासी महिलांच्या मुलांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. लक्ष्मी देवीच्या जागी बसवण्यात आलेल्या मूर्तीजवळ घुबडाची मूर्ती आहे, तर सरस्वती देवीजवळ बदकाची मूर्ती आहे. ही दोन्ही त्या देवींची वाहनं आहेत. त्याचबरोबर यांच्यामध्ये एक हत्तीचं डोके असणाऱ्या मुलाची देखील मूर्ती बसवण्यात आली आहे. ही गणपती बाप्पाची प्रतीकात्मक मूर्ती आहे.

  हे वाचा - महिलांच्या हक्का करता 'सुप्रीम' निर्णय, आता सूनेला घराबाहेर काढता येणार नाही

  मंडळाने आपली थीम या वर्षी 'दिलासा' अशी ठेवली आहे. या मंडळाने बसवलेली ही प्रवासी महिलेची मूर्ती त्यांच्याकडे मदतीसाठी येत असल्याचे दिसून येते. ही मूर्ती साकारणारा मूर्तीकार रिंकू दास याने 'द टेलीग्राफ'ला दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला देवीच्या रूपात दर्शवण्यात आलं आहे. कोरोनाच्या या संकटात कडक उन्हात ही साहसी आणि धाडसी महिला आपल्या मुलाला घेऊन जात आहे. आपल्या मुलांसाठी जेवण आणि पाण्याच्या शोधात फिरताना ती दिसत आहे.

  हे वाचा - सावधान! ऑनलाइन शॉपिंग करताना नकली सामान देऊन होतेय फसवणूक, वाचा अशावेळी काय कराल

  दरम्यान, याविषयी बोलताना मंडळाच्या कमिटी सदस्यांनी सांगितलं की, कोरोनाच्या काळात या प्रवासी मजूर महिलांनी केलेल्या कष्टाला सलाम करण्यासाठी आम्ही या वर्षी या पद्धतीने मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. ही मूर्ती केवळ त्यांचं दुःख दर्शवत नाही तर त्यांच्या शौर्याला सलाम देखील करते.

  हे वाचा - महिलांच्या बँक खात्यामध्ये 2.20 लाख जमा करतंय सरकार? वाचा काय आहे सत्य

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Kolkata, West bengal

  पुढील बातम्या