श्रीनगर, 10 ऑगस्ट : IAS ची नोकरी सोडून राजकीय नेता झालेले शाह फैजल यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शाह फैजल हे प्रशासकीय सेवेत पुन्हा रुजू होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, आयएएस होऊन मी राष्ट्राच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरलो आहे.
काहीजण मला देशविरोधी म्हणत असल्याने शाह फैजल दु:खी झाले आहेत. पुढे ते म्हणाले, मला कोणीही देशद्रोही म्हणू शकत नाही. मला येथून पुढे जायचे आहे आणि पुन्हा सर्व नव्याने सुरू करण्याची इच्छा आहे. भविष्यात जी काही परिस्थितीत असली तरी जीवन थांबू शकत नाही. आपल्या समोर गरीबी, अशिक्षिकता, असमानता आणि बेरोजगारीच्या मोठ्या समस्या आहेत. पुढल्या वेळेस कुठे जाईन हे वेळच सांगू शकेल.
हे वाचा-मोठी बातमी! बंड शमलं; सचिन पायलट यांच्या घरवापसीचा प्रस्ताव निश्चित
गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी जेव्हा जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा निर्णय घेतला तेव्हा, इतर नेत्यांप्रमाणे शाह फैजल यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना सोडण्यात आलं आहे. त्यानंतर शाह फैजल यांनी पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचा-वाद चिघळणार! सुशांतचा भाऊ ठोकणार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा
जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंटचे वरिष्ठ नेता फिरोज पीरजादा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे नक्की आहे की शाह फैजलने स्वत:ला वेगळं केलं आहे आणि पार्टी नेत्यांनी मला नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे.