चंदिगढ, 5 सप्टेंबर : झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीत (
Fire) एका इंजिनिअरचा (
an engineer) मृत्यू (
death) झाला आहे, तर त्याच्यापाशी निजलेली त्याची 5 वर्षांची मुलगी (
daughter) गंभीर जखमी (
seriously injured) आहे. झोपेत असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे खोलीला लागलेल्या आगीत काही कळायच्या आतच झोपेत असणाऱ्या इंजिनिअरचा मृत्यू झाला, तर त्याच्या 5 वर्षांची मुलगी या घटनेत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
अशी लागली आग
हरियाणातील बामनीखेडा गावातील मंशा ग्रीन सोसायटी या इमारतीत विनोद नावाचा 32 वर्षांचा इंजिनिअर आणि त्याची 5 वर्षांची मुलगी दिव्या राहत होते. रोजच्या प्रमाणे हे दोघे झोपी गेले असताना अचानक खोलीने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच खोलीतील प्रत्येक वस्तूने पेट घेतला आणि विनोदला या आगीने घेरले. गंभीररित्या भाजल्यामुळे विनोदचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दिव्याला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं असलं तरी या दरम्यान तिलाही आगीचे चटके बसले असून गंभीररित्या ती जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तिच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
भीषण आग
ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांमध्ये खोलीचे सर्व दरवाजे आणि खिडक्या तर जळाल्याच, मात्र खोलीतील फरशीलादेखील तडे गेले. या खोलीतील एक अन एक वस्तू जळून खाक झाली. पोलिसांनी विनोदचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.
मुलीची तब्येत गंभीर
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षांच्या दिव्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तिची तब्येतही अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कुटुंबीयांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
हे वाचा -
पुण्यातील तरुणीला आईच्या रिलेशनशीपचा लागला सुगावा;BFच्या मदतीनं उकळले लाखो रुपये
शॉर्ट सर्किटमुळे आग
ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी कुणाही विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. विनोद हा कॉम्प्युटर इंजिनिअर होता आणि तो सायबर कॅफे चालवत असे. त्याचे वडील हे सैन्यात मेजर आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.