S M L

'ती' आली... तिनं पान खाल्लं... आणि खातच राहिली

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2017 01:20 PM IST

'ती' आली... तिनं पान खाल्लं... आणि खातच राहिली

29 मे : काही लोकांना रात्रीचं जेवण झाल्यानंतर पान खाण्याची सवय असते. मात्र मध्य प्रदेशातील सागर भागातील एका हत्तिणीला चक्क पान खाण्याची पान खाण्याचं 'नाद' लागला आहे.

या हत्तिणीचं नाव आहे लक्ष्मी.  गेल्या सहा वर्षांपासून लक्ष्मी दररोज आपल्या माहुतासोबत शहरात फिरायला येते आणि न चुकता याच पानपट्टीवर  पान खायला थांबते. आपण जसं आपल्या आवडीचं ठराविक पान खातो, तसंच लक्ष्मीसुद्धा तिच्या आवडीचं ठाराविक पान खाते.

प्राण्यांबद्दल तुम्ही आजपर्यंत अनेक मनोरंजक गोष्टी ऐकल्या असतील. आपल्या गल्लीत हत्ती आला की आपण त्याला गणेशाचं रूप समजून फळं किंवा भाजी-पाला देऊ करतो. पण मध्य प्रदेशातली ही अवलिया दररोज तीन किलोमीटर चालत या पानपट्टीच्या ठेल्यावर येते आणि पान खाऊन जाते.लक्ष्मीच्या माहुताच्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून तो लक्ष्मीला दिवसाआड बाहेर फिरायला घेऊन जातो. भितर बाजारात आल्यावर लक्ष्मीबरोबर अनिल गुप्ताच्या पानपट्टीबाहेर येऊन थांबते आणि जोपर्यंत अनिल गुप्ता तिला पान भरवत नाही तोपर्यंत ती तिथून हलत नाही.  गेल्या सहा वर्षांपासून हा सिलसिला सुरू आहे.

लक्ष्मीची स्वारी येणार म्हटल्यावर  पानपट्टीवाला देखील तिच्यासाठी तिच्या आवडीचं पान तयार करून ठेवतो. आता हत्तीचं पोट म्हटल्यानंतर ते एका-दोन पानावर थोडंच ना भरणारे..चांगलं आठ-दहा पानांवर ताव मारून तृप्त झाल्यावरच लक्ष्मीची स्वारी तिथून प्रस्थान ठेवते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2017 01:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close