मराठी बातम्या /बातम्या /देश /

ऐकावं ते नवलच ! रिक्षा पोहोचली हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर, अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे

ऐकावं ते नवलच ! रिक्षा पोहोचली हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर, अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे

 एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या (Multi speplicity hospital) पाचव्या मजल्यावर (Fifth floor) एक रिक्षा (Auto Rickshaw) पोहोचली आणि रुग्णालयातल्या डॉक्टर, नर्स, अधिकारी आणि रुग्ण या सगळ्यांचेच धाबे दणाणले.

  • Published by:  desk news

भोपाळ, 18 जुलै : एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या (Multi speplicity hospital) पाचव्या मजल्यावर (Fifth floor) एक रिक्षा (Auto Rickshaw) पोहोचली आणि रुग्णालयातल्या डॉक्टर, नर्स, अधिकारी आणि रुग्ण या सगळ्यांचेच धाबे दणाणले. (Shocked) रुग्णालयात व्हिलचेअरवरील (Wheel chair) रुग्णांची ने-आण करण्यासाठी बांधलेल्या रॅम्पवरून जोरदार आवाज करत रिक्षा पाचव्या मजल्यावर पोहोचली आणि सर्व अधिकारी धावत बाहेर आले.

औषधांनी भरलेली रिक्षा

या रिक्षामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधं होती. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील एका रुग्णालयानं मागवलेली औषधं घेऊन ही रिक्षा चक्क पाचव्या मजल्यावर आली. औषधांची खातरजमा केल्यानंतर ती खरोखरच रुग्णालय प्रशासनानं मागवलेली औषधं असल्याचं सिद्ध झालं. यापूर्वीदेखील अनेक्दा अशा प्रकारे औषधं मागवली गेली होती. मात्र रिक्षा थेट पाचव्या मजल्यावर येण्याचा प्रकार प्रथमच घडत होता. याबाबत रिक्षाचालकाकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तेव्हा या प्रकाराचा उलगडा झाला.

नेमकं काय घडलं?

रिक्षाचालकाने सुरुवातीला हे सामान घेऊन तळमजल्यावर वाट पाहिली. मात्र हॉस्पिटलचा एकही कर्मचारी ते सामान उतरवून घेण्यासाठी आला नाही. अनेकांना त्यांने सामान उतरवून घ्यायला सांगितले, मात्र कुणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर, त्याने रागाच्या भरात रिक्षा रॅम्पवरून वरच्या मजल्यावर न्यायला सुरुवात केली. बघता बघता चार मजले क्रॉस करून पाचव्या मजल्यावर पोहोचला, तेव्हा रिक्षाच्या आवाजाने सर्व डॉक्टर आणि अधिकारी बाहेर आले.

हे वाचा -मुंबईकरांसाठी काळरात्र; 21 जणांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा

निष्काळजीपणाचं आश्चर्य

हा रिक्षाचालक जेव्हा रॅम्पवरून रिक्षा चालवत ती वर आणत होता, तेव्हा एकाही कर्मचाऱ्यानं त्याला रोखण्याचा किंवा जाब विचारण्याचा प्रयत्न केला नाही, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आपल्याला काय त्याचे, या भावात सगळेच कर्मचारी वागत असल्यामुळे रिक्षावाला थेट पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकला. अशा प्रकारे जर कुणाचेच लक्ष नसेल तर रुग्णांच्या सुरक्षेचं काय,असा प्रश्न सर्वांनाच पडला. वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रिक्षाचा या आवाजाचा त्रासदेखील झाला. अनेकजण भयभीत झाले. नेमका प्रकार समजल्यानंतर सर्वांनी सुरकेटा निश्वास सोडला खरा, पण रुग्णालयाच्या सुरक्षेबाबतचं भोंगळ चित्र चव्हाट्यावर आलं.

First published:

Tags: Autorickshaw driver, Madhya pradesh, Private hospitals