Home /News /national /

कधी पाहिला नसेल असा वाद; कुत्र्याच्या 42 पिल्लांसाठी दोन महिलांमध्ये कायदेशीर लढाई

कधी पाहिला नसेल असा वाद; कुत्र्याच्या 42 पिल्लांसाठी दोन महिलांमध्ये कायदेशीर लढाई

यातील एका महिलेने तर पिल्ल परत येईपर्यंत अन्नाचा कणही खाणार नसल्याचा निर्धार केला आहे

    राजस्थान, 4 डिसेंबर : जोधपूर शहरातून एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे पाहून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. दोन महिलांमध्ये कुत्र्याच्या 42 पिल्लांना ठेवण्यासाठी वाद सुरू आहे. यात एका महिलेने दुसर्‍या महिलेवर कुत्र्याची 42 पिल्ले जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी, दुसरी महिला आपली बाजू मांडत आहे. आता ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली असून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. डॉगीच्या 42 मुलांसाठी भांडण जोधपूरमधील कुत्र्याच्या 42 पिल्लांसाठी कायदेशीर लढाई पाहून शहरातील लोक हैराण झाले आहेत. या प्रकरणात एक पक्ष रतनदा भागातील सेंट्रल स्कूल स्कीम भागात राहणारी संगीता सुराणा या लढवत आहेत. त्यांचा आरोप आहे की, एका महिलेने जबरदस्तीने त्यांच्या घरातील कुत्र्याची 42 पिल्ले घेऊन गेली. त्याचवेळी जोधपूरच्या सेक्टर -7 मध्ये राहणाऱ्या रीमा मॅसी म्हणाल्या की, त्यांनी कुत्र्यांच्या 42 पिल्लांचा जीव वाचविला आहे. पहिली महिला म्हणते... संगीता सुरानी यांनी वी द पीपल संस्थेला सांगितलं की, काही लोक आले आणि त्यांनी कुत्र्याची 42 पिल्ल तिच्या घरातून जबरदस्तीने घेऊन गेले. ती सर्व पिल्ले परत दिली जावीत. यावर संस्थेच्या संस्थापक मंजू सुराणा यांनी रतनदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संगीता यांनी सांगितलं की, ती कुत्र्यांची पिल्लं परत येईपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही. तर दुसरी महिला म्हणते.. रीमा मॅसीच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या भागात राहणाऱ्या संगीता सुराणी यांच्याकडे कुत्र्याची 42 पिल्लं आहेत. त्यांना अत्यंत निर्दयपणे एका बॉक्समध्ये ठेवले आहेत. यानंतर ती इतर सामाजिक कार्यकर्त्यांसह संगीताच्या घरी पोचली आणि कुत्र्यांच्या पिल्लांची सुटका केली. पोलिसांच्या उपस्थितीतच तिने कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव वाचविला असा दावा रीमाने केला आहे. रीमाच्या म्हणण्यानुसार, संगीताने तिच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संगीताविरुध्द पोलिसात तक्रार करायची होती, पण गुन्हा नोंदवता आला नाही, असं तिने सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Owner of dog

    पुढील बातम्या