Home /News /national /

पतीने नवी साडी घेतली नाही म्हणून संतप्त महिलेने 6 महिन्यांच्या पोटच्या मुलीला आपटून मारले

पतीने नवी साडी घेतली नाही म्हणून संतप्त महिलेने 6 महिन्यांच्या पोटच्या मुलीला आपटून मारले

आरोपी महिलेच्या नणंदेने मुलीला मारत असतानाचा व्हिडीओ शूट केला आहे

    अलीगढ, 2 मार्च : आई...फक्त नाव घेतलं तरी ह्रदय पिळवटून निघतं. आई असतेच अशी. मुलांसाठी जीव देणारी. मात्र ही घटना वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या घटनेने क्रुरपणाची परिसीमाच गाठली आहे. पतीकडून नवी साडी न मिळाल्याने नाराज झालेल्या या महिलेने आपल्याच सहा महिन्यांच्या मुलीला खूप मारले. तिने मुलीला जमिनीवर आपटून मारले आणि त्यातच मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात महिलेला ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेच्या नणंदेने मुलीला मारत असताना व्हिडीओ केला आहे. ही घटना जवा ठाणे क्षेत्रातील रामपुर गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपुर गावात राहणारा राहुल एका कारखान्यात काम करतो. पाच वर्षांपूर्वी पिंकी नावाच्या एका मुलीसोबत त्याचा विवाह झाला होता. राहुलने सांगितल्यानुसार, त्याच्या पत्नीने साडी हवी असल्याचं सांगितलं होतं. मात्र तीन दिवसांपासून राहुलची तब्येत बरी नसल्याने तो पत्नीला साडी आणून देऊ शकला नाही. सोमवारी पिंकीने राहुलकड़े साडी आणण्यासाठी पैसे मागितले. यानंतर राहुलने तिला दोन दिवसांनी पैसे देतो असं सांगितलं. या गोष्टीवरुन दोघांमध्ये खूप वाद सुरू झाला. हा वाद वाढायला लागल्यानंतर राहुलने पिंकीजवळ बसलेल्या त्यांच्या सहा महिन्याच्या मुलीला खेचून घेतले. मात्र पिंकीने पुन्हा राहुलकडून मुलीला खेचून घेतले आणि ती आतल्या खोलीत निघून गेली. पिंकीने पहिल्यांदा मुलीला जमिनीवर आपटले. अत्यंत क्रूरपणे ती बाळाला मारत होती. ती त्या बाळाला जोरजोरात मारत होती. जमिनीवर पडलेले ते बाळही मोठमोठ्याने रडत होते. पिंकी मुलीला जमिनीवर आपटून मारत होती. काही वेळाने मुलीची तब्येत खराब झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. हे वाचा - आई झालेल्या या महिला IAS चं जगभरातून कौतूक, कामगिरी पाहून तुम्हीही कराल सलाम याबाबत पिंकीच्या पतीने सांगितले की, ‘तिने माझ्याहातून मुलीला खेचून घेतलं आणि तिला जमिनीवर आपटून मारलं. माझ्या बहिणीने याचा व्हिडीओ केला. ती मला याबाबत सांगायला येण्यापूर्वीच मुलीचं रडणं थांबलं होतं. मी जाईपर्यंत पिंकीने मुलीला आपटून मारुन टाकलं होतं.’
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Killed, Mother

    पुढील बातम्या