मराठी बातम्या /बातम्या /देश /

4 किमीच्या अंतरासाठी आकारले 10 हजार रुपये, रुग्णवाहिकेनं घेतलेल्या अव्वाच्या सव्वा बिलाचा फोटो व्हायरल

4 किमीच्या अंतरासाठी आकारले 10 हजार रुपये, रुग्णवाहिकेनं घेतलेल्या अव्वाच्या सव्वा बिलाचा फोटो व्हायरल

Corona virus: देशाची राजधानी दिल्लीतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका रुग्णवाहिकेनं अवघं 4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी तब्बल 10 हजार रुपये आकारले आहेत.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 02 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची (Corona cases) संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) भारतात आपलं उग्र रुप दाखवत आहे. त्यामुळे देशात दररोज तीन लाखाहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहेत. परिणामी देशातील बहुतांशी ठिकाणी नागरिकांना ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकिय सुविंधासाठी मोठ्या प्रमाणात ओढाताण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत काहीजणांनी मात्र कोरोनाच्या संकटकाळात पैसे कमावण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. देशाची राजधानी दिल्लीत अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना समोर येताच सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे. येथील एका रुग्णवाहिकेनं अवघं चार किलोमीटर अंतर जाण्यासाठी तब्बल 10 हजार रुपये आकारले आहेत. हे प्रवास भाडं आकारल्याची पावती सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. यावर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अरुण बोथ्रा नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं 10 हजार रुपयांचं प्रवासभाडं आकारल्याची पावती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'अवघ्या 4 किलोमीटर अंतरासाठी दिल्लीतील एका रुग्णवाहिकेनं 10 हजार रुपये आकरले आहेत. लोकांचा हा काळाबाजार जग उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. ही बाब केवळ संतापजनकच नाही तर नैतिक मुल्यांवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे.'  पावती दिल्लीतील डी के एम्ब्यूलेंस सर्विसची आहे. हे ही वाचा-मुंबईतील शिक्षकाच्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग,घेतला कोरोना रुग्णांच्या मदतीचा वसा अशा प्रकारे कोरोना रुग्णांकडून पैसे उकळण्याचा हा पहिलाचं प्रकार नाहीये. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनसाठी तब्बल 35 हजार रुपये आकारल्याच्या बातम्याही समोर आली आहे. या प्रकरणी काल दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयातून एका नर्सला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
First published:

Tags: Corona spread, Delhi

पुढील बातम्या