Home /News /national /

VIP गाड्यांसाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका, धक्कादायक VIDEO आला समोर

VIP गाड्यांसाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका, धक्कादायक VIDEO आला समोर

चेन्नई पोलिसांनी आज आयर्लंड ग्राउंड येथील रुग्णवाहिकेला थांबवत VIP गाड्यांना पहिले जाण्याची परवानगी दिली.

    चेन्नई, 27 एप्रिल : कोरोनामुळं देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं गेले काही दिवस लोक घरांमध्ये कैद आहेत. परिणामी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. केवळ आवश्यक असल्याच घरा बाहेर पडण्यास लोकांना सांगितले आहे. पोलिसांची विशेष तुकडे लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर असेत. अशा सगळ्या परिस्थितीत पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. चेन्नईमध्ये पोलिसांनी काही VIP गाड्यांसाठी रुग्णवाहिका आणि यात्रींना थांबवले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पोलिसांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. चेन्नई पोलिसांनी आज आयर्लंड ग्राउंड येथील रुग्णवाहिकेला थांबवत VIP गाड्यांना पहिले जाण्याची परवानगी दिली. दरम्यान, अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही आहे. तसेच, रुग्णवाहिका रिकामी होती की नाही, याबाबतही माहिती मिळालेली नाही आहे. वाचा-कोरोनाला हरवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार, 27 जिल्ह्यांसाठी सरकारची युद्धनीती वाचा-POSITIVE NEWS : लस...ड्रोन आणि रोबो, तंत्रज्ञानाच्या पातळीवर भारतात प्रयत्न एकीकडे भारत कोरोनासारख्या भयंकर अशा जैविव युद्धात आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांच्या चाचण्या करण्यावर विशेष जोर दिला जात आहे. अशा परिस्थिती रुग्णवाहिका रस्त्यात थांबवणे धोक्याचे ठरले असते. वाचा-'महिलांच्या तोकड्या कपड्यांमुळे झाला कोरोना', पाकच्या मौलानांनी ओकली गरळ लॉकडाऊन वाढण्याची शक्यता देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं यानंतर काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेनुसार हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. तर, कोरोना विषाणूच्या साथीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने एक मोठी योजना तयार केली आहे. येत्या एका आठवड्यात देशातील 11 राज्यांतील 27 जिल्ह्यांना कोरोना मुक्तीसाठी संपूर्ण शक्ती देण्याची सरकारची योजना आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या