ओरिएंटल बँकेतही घोटाळा; ज्वेलरी निर्यातदारानं लावला 390 कोटींचा चुना

ओरिएंटल बँकेतही घोटाळा; ज्वेलरी निर्यातदारानं लावला 390 कोटींचा चुना

द्वारका दास सेठ इंटरनॅशनल लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. तब्बल 390 कोटींचा हा घोटाळा आहे.

  • Share this:

24 फेब्रुवारी : पंजाब नॅशनल बँकनंतर आता आणखी एका बँकेत घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. एका ज्वेलरी निर्यातदारानं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला 390 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. द्वारका दास सेठ इंटरनॅशनल लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. तब्बल 390 कोटींचा हा घोटाळा आहे.

2007 ते 2012 या काळात बँकेकडून हमीपत्र घेऊन कंपनीनं अनेक लोकांना पैसे दिले होते. पण त्याची परतफेड अजूनही केलेली नाही. सीबीआयनं 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सभ्या सेठ, रीटा सेठ, कृष्ण कुमार सिंग आणि रवी सिंग अशी या संचालकांची नावं आहेत.

First published: February 24, 2018, 9:18 AM IST

ताज्या बातम्या